पुणे – पाषाण टेकडी वाचवा हो; पर्यावरणप्रेमींची हाक

जैवविविधतेला धोका : आज ठिकठिकाणी स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन

पुणे – जैवविविधता संवर्धनाच्या दृष्टीने महत्वाचे ठिकाण असलेल्या पाषाण टेकडी येथे महापालिकेतर्फे सिमेंट-क्रॉंक्रिटचा रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे. मात्र, यामुळे परिसरातील जैवविविधता नष्ट होत असून पर्यावरणावर त्याचे वाईट परिणाम होतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे. टेकडीवरील कॉंक्रिटीकरण रोखण्यासाठी तसेच परिसरातील जैवविविधतेचे संवर्धन व्हावे, यासाठी शहरातील पर्यावरणप्रेमी सरसावले असून, या कामात जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले जात आहे.

बाणेर-पाषाण टेकडी ही निसर्ग सौंदर्याने नटलेली, वृक्षसंपदेने संपन्न आणि शेकडो पक्षी आणि प्राण्यांचे वास्तव्य असलेला परिसर आहे. इतकेच नव्हे, तर या परिसरात भूजल अधिभरण होऊन परिसरातील भूजल पातळी वाढविण्यासाठीदेखील ही टेकडी आणि येथील निसर्गसंपदा उपयुक्त ठरते. मात्र, याठिकाणी सध्या क्रॉंक्रिटीकरण सुरू आहे. यामुळे परिसरातील पर्यावरण धोक्‍यात आले आहे. याठिकाणची जैवविविधता जपण्यासाठी बाणेर-पाषाण टेकडी बचाव कृती समिती पुढे आली असून, दि.1 मे रोजी टेकडी परिसरात नागरी सह्यांची मोहिम राबविली जाणार आहे. तसेच यावेळी पथनाट्याचे सादरीकरणही केले जाणार आहे.

याबाबत समितीचे धर्मराज पाटील म्हणाले, “बाणेर-पाषाण टेकडी परिसरात मोठ्या प्रमाणात जैवविविधतेचे वास्तव्य आहे. केवळ जैवविविधतेच्या दृष्टीने नव्हे, तर पाणी साठवणुकीच्या दृष्टीनेही हा प्रदेश महत्त्वपूर्ण आहे. मात्र, क्रॉंक्रिटीकरणामुळे येथील जैवविविधतेला धोका निर्माण झाला असून, तो रोखण्यासाठी समितीचे कार्यकर्ते प्रयत्न करत आहेत.’

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.