पुणे : पावसाळ्यात नदीपात्रातील मेट्रोचे काम रखडणार

संग्रहित छायाचित्र

पुणे- महामेट्रोकडून वनाज ते धान्यगोदाम या मार्गाचे काम तीन ठिकाणी सुरू करण्यात आले आहे. त्यातील नदी पात्रातील काम पावसाळयात चार महिने बंद पडण्याची शक्‍यता आहे. महामेट्रोडून कर्वेरस्त्यावरील सावरकर स्मारक ते कॉंग्रेसभवनपर्यंत नदीत तब्बल 59 खांब उभारण्यात येणार आहेत. त्यातील अवघ्या 5 खांबचे काम जमिनीच्या वर झाले आहेत तर, 17 खांबाच्या फाऊंडेशनचे काम पूर्ण झाले आहे.

तर, मे महिन्यात आणखी 5 ते 10 खांबाचे फाउंडेशन पूर्ण केले जाणार आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी नदीपात्रात केवळ 25 ते 30 खांबाचे काम महामेट्रोला करता येणार असून त्यानंतर जुलै ते ऑक्‍टोबर हे काम बंद ठेवावे लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

वनाज ते धान्यगोदाम या मार्गात सुमारे 1. 10 किलोमीटरच मार्ग हा नदीपात्रात असून तीन स्थानकेही नदीच्या काठावर असणार आहेत. या स्थानकांचे काम अद्यप सुरू झालेले नसले तरी, महामेट्रोकडून नदीपात्रात प्रस्तावित असलेल्या 59 खांबांसाठीची खोदाई सुरू करण्यात आली आहे. महामेट्रोकडून पावसाळ्यापूर्वी या सर्व कामांचे फाउंडेशन पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले होते.

मात्र, सध्या पौड रस्ता, कर्वे रस्ता आणि नदीपात्रात एकच वेळी काम सुरू आहे. त्यामुळे नदीपात्रातील कामाचा वेग मंदावल्याचे चित्र आहे. पावसाळयात सर्वसाधरणपणे जुन आणि जुलै महिन्यात शहराला पाणी पुरवठा करणारे खडकवासला धरण भरण्यास सुरूवात होते. त्यामुळे धरणातून मोठ्या प्रमाणात मुठा नदीत पाणी सोडण्यात येते. त्यामुळे मेट्रोला या महिन्यांमध्ये खोदाई करून ठेवता येणार नाही. तसेच ज्या खांबाचे फाउंडेशन पूर्ण झाले आहे. अशा खांबांचे काम जमिनीच्यावर आवश्‍यक असणार आहे. त्या अनुषंगाने नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी नदीपात्रातील काम संपविणे मेट्रोला शक्‍य होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

सांडपाणी वाहिनीचाही अडथळा
महामेट्रोचे खांब नदीपात्राच्या ज्या भागात आहे. त्या भागातच महापालिकेची मुख्य सांडपाणी वाहिनीही आहे. त्यामुळे ज्या-ज्या ठिकाणी ही सांडपाणी वाहिनी आहे. त्या ठिकाणी मेट्रोकडून ती वाहिनी आधी सुरक्षित केली जात आहे. त्यानंतरच मेट्रोच्या खांबाचे काम केले जात आहे. सुमारे 20 पेक्षा अधिक ठिकाणी ही सांडपाणी वाहिनी अडथळा ठरत असल्याने मेट्रोचे काम मागे पडल्याचे महामेट्रोच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)