पुणे – पालिकेतील जिवंत झरा पुणेकरांना पुरविणार पाणी

टॅंकर पॉईंट सुरू करणार : पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी केली पाहणी

पुणे – महापालिकेच्या नवीन विस्तारीत इमारतीच्या खाली बंदिस्त करण्यात आलेल्या पाण्याच्या जिवंत झऱ्याचा वापर आता टॅंकर भरण्यासाठी केला जाणार आहे. त्यासाठी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकतीच या झऱ्याची माहिती भवन विभागाकडून घेतली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिकेने सुमारे 50 कोटी रूपये खर्चून विस्तारित इमारत बांधलेली आहे. इमारतीचा पाया खोदताना पाण्याचा जिवंत मोठा झरा आढळून आला होता. या झऱ्यात येणारे पाणी लक्षणीय असल्याने हे पाणी ही इमारत बांधताना दोन मजले खाली “सबवेल’ बांधून बंदिस्त करण्यात आले आहे. तसेच ते बाहेर काढण्यासाठी दिवसातून 16 तास उच्च क्षमतेचे पंप सध्या सुरू आहेत. या झऱ्याचे पाणी एवढे प्रचंड आहे की त्यामुळे इमारतीच्या तळमजल्यात वारंवार हे पाणी भिंतीमधून झिरपून येत आहे. त्यामुळे भविष्यात या इमारतीच्या पायाला धोका निर्माण होण्याची शक्‍यता आहे. ही बाब लक्षात घेऊन हे पाणी टॅंकर पॉईंट उभारून इतर कामांसाठी वापरण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. ही इमारत बांधतानाच भवन विभागाने त्यासाठीच्या आवश्‍यक जलवाहिन्यांचे जाळे केलेले असून त्याचा वापर या पॉईंटसाठी केला जाणार असल्याचे पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)