पुणे- परिवहन विभागातर्फे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन

– विविध विषयांवरील कार्यशाळेतून मिळणार प्रशिक्षण

पुणे- अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी दरवर्षी करण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पातळीवर राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचे आयोजन यंदाही करण्यात आले आहे. यासंबंधी महाराष्ट्रात परिवहन विभागाने राज्यात जनजागृती मोहिम आखली आहे. त्यामध्ये रस्ता अपघातांची कारणे, अपघातांचे प्रकार व अपघातांची ठिकाणे, अपघातांची वेळ, सुरक्षाविषयक मार्गदर्शनन, रिक्षाचालकांसाठी कार्यशाळा, सुरक्षा साहित्याचे वाटप आदींबाबत वाहन चालकांमध्ये जनजागृती केली जाणार आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन कार्यालयामधून देण्यात आली.

भारतात वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. देशातील वाढत्या अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताह साजरा केला जात आहे. पुणे शहर तसेच जिल्ह्यात दिनांक 23 एप्रिल ते 7 मे पर्यत रस्ता सुरक्षा सप्ताह साजरा केला जाणार आहे. सोमवारी पुणे जिल्ह्यात 29 व्या राष्ट्रीय रस्ते सुरक्षा सप्ताहाला सुरुवात झाली. पुणे शहर तसेच जिल्ह्यात हे अभियान राबवले जाणार आहे.

यामध्ये पीएमपीएमल व एसटी महामंडळाच्या वाहन चालकांसाठी कार्यशाळा तसेच ड्रायव्हिंग स्कूलच्या प्रशिक्षकांना प्रशिक्षण देणे, जिल्ह्यातील विविध भागात अवैधी प्रवासी वाहतूक, ओव्हरलोड, रिफ्लेक्‍टर, टेल लॅम्प, हेल्मेट आदींबाबत तपासणी मोहिम राबविण्यात येणार आहे. तसेच अपघातांच्या कारणांवर भर दिला जाईल. रेल्वे क्रॉसिंग, झेब्रा क्रॉसिंग, बसस्टॉप, शाळा कॉलेजचा परिसर, रस्त्यांवरील अतिक्रमणांची ठिकाणे, अरुंद रस्ते, घाटरस्ते आदी अपघातांची ठिकाणांबाबत जागृत राहण्यासाठी चालकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या सप्ताहामध्ये बसा-स्कूलबस चालक, मालक यांच्यासाठी बस असोसिएशन यांच्या सहकार्याने विशेष कार्यशाळा तसेच वाहन चालक, पोलीस कर्मचारी, वाहतूक पोलीस यांच्यासाठी धोकादायक रसायन हाताळणी यासंबंधी प्रात्यक्षिक आणि प्रशिक्षणाचा कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. हा कार्यक्रम शहरसहित लोणी काळभोर, जेजुरी, आळंदी रस्ता, उरळी कांचन, उर्से टोलनाका, भोर, वेल्हा आदी ठिकाणांसहित जिल्हापातळीवर राबविण्यात येणार आहे.

——————–

या अभियानामध्ये अपघाताचे प्रमाण कमी करण्याबरोबरच रस्ता सुरक्षा वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. सर्व अपघातांची कारणे व त्यावरील उपाय याची माहिती चालकांना दिली जाईल. पुढील पंधरा दिवस विविध ठिकाणी जनजागृती केली जाणार आहे. यामध्ये गाड्यांना रिफ्लेक्‍टीव्ह टेप लावणे, रस्ता सुरक्षा साहित्याचे वाटप तसेच चालकांना मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी चंद्रशेखर चव्हाण यांनी सांगितले.
-चंद्रशेखर चव्हाण, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)