पुणे – पदनाम बदललेल्या कर्मचाऱ्यांचे आता वेतनाकडे लक्ष

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पदनाम बदललेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे जानेवारी महिन्यातील वेतन 7 ऑक्‍टोबर, 2009 च्या अधिसूचनेनुसार होणार असल्याचे उच्च शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे पदनाम बदललेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आता 2 दिवसांत होणाऱ्या वेतनात मोठी कपात होणार आहे. त्यामुळे या महिन्याच्या वेतनात किती कपात होणार आहे, याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

पदनाम केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांची नव्याने वेतननिश्‍चिती करण्याची कार्यवाही सुरू आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण होण्यास आणखी कालावधी लागेल. त्या पार्श्‍वभूमीवर जानेवारी महिन्याचे वेतन 7 ऑक्‍टोबर, 2009 च्या अधिसूचनेनुसार होतील, अशी माहिती राज्याचे उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. मोहन खताळ यांनी दिली. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विद्यापीठात अधिकारी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन वाढविण्यासाठी केलेले पदनामाचा निर्णय गेल्याच महिन्यात राज्य शासनाने रद्द केला आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना पदनाम बदलाच्या पूर्वीच्या मूळ पदावर काम करावे लागेल. पदनाम बदलल्यामुळे आतापर्यंत वाढीव वेतन घेतलेले आहे, ती रक्‍कमही कर्मचाऱ्यांकडून वसूल करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यामुळे पदनाम बदललेल्या विद्यापीठातील कर्मचाऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

यासंदर्भात डॉ. खताळ म्हणाले, राज्य शासनाने पदनाम बदललेल्या कर्मचाऱ्यांची पुन्हा वेतनश्रेणी करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी एक समिती नेमण्यात आली. समितीकडून विद्यापीठात पदनाम बदललेल्या कर्मचाऱ्यांची वेतन पडताळणी सुरू आहे. त्यांचे वेतन निश्‍चित करण्याचे काम सुरू आहे. पुणे विद्यापीठात आतापर्यंत 200 कर्मचाऱ्यांची वेतन निश्‍चिती झाली आहे. समितीला दि. 31 जानेवारीपर्यंत ही सर्व प्रक्रिया राबविण्याच्या सूचना दिल्या होत्या. या वेळेत ही प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्‍यता कमी आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांचे वेतन 7 ऑक्‍टोबर, 2009 च्या अधिसूचनेनुसार करण्याचे आदेश दिले आहेत. याचाच अर्थ आता जानेवारी महिन्याचे होणारे वेतन कमी होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

“क’ गटातील कर्मचाऱ्यांची संख्या सर्वाधिक
पुणे विद्यापीठात वर्ग “अ’ पासून वर्ग “ड’ या सर्वच गटांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे पदनाम बदललेल्याची संख्या सुमारे 600च्या आसपास आहे. त्यात “क’ गटातील कर्मचाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. या सर्व कर्मचाऱ्यांनी वित्तीय नियमानुसार वेतनश्रेणी करण्यासाठी आणि त्यात पदोन्नती झालेल्या कर्मचाऱ्यांचे वेतनश्रेणी निश्‍चित करावे लागणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर मूळ पदावर असताना जे वेतन होते, तेच वेतन आता मिळणार आहे. त्यामुळे आता वेतनात किती कपात होणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)