पुणे: …पण, झाडांची तपासणी करण्यासाठी मनुष्यबळच नाही

उद्यान विभागप्रमुखांची भर पत्रकार परिषदेच कबुली

पुणे – महापालिकेच्या उद्यान विभागाकडे झाडे तोडण्याची परवानगी दिल्यानंतर नियमानुसार संबंधित व्यक्तीने दुसरी झाडे लावली की नाहीत याची तपासणी करण्यासाठी मनुष्यबळच उपलब्ध नसल्याची कबुली उद्यान अधिक्षक अशोक घोरपडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

महापालिकेच्या वृक्ष संवर्धन समितीकडून झाडे तोडण्यासाठी परवानगी देण्यात येते. मात्र झाड तोडण्याच्या बदल्यात एकास तीन झाडे लावणे बंधनकारक आहे. त्यातूनही ती झाडे ही भारतीय वंशाची असावीत असा दंडक आहे. याशिवाय झाडे तोडण्याआधी महापालिकेकडे डिपॉझिट जमा करावे लागते. त्यानंतर तोडलेल्या झाडाच्या बदल्यात लावलेल्या तीन झाडांची पाच वर्षापर्यंत निगा राखावी लागते. दरवर्षी लावलेल्या या झाडांची पाहणी महापालिकेच्या उद्यान विभागाकडून करणे बंधनकारक आहे. पाच वर्षे ही झाडे जगली, तरच संबंधितांना त्याचे डिपॉझिट नियमानुसार परत केले जाते. याशिवाय संबंधित विकसकाला बांधकाम पूर्णत्त्वाचा दाखलाही दिला जात नाही.

महापालिका वर्षाभरात शेकडो झाडे तोडण्याची परवानगी देते. परंतु संबंधित व्यक्ती अथवा विकसकांनी पुन्हा झाडे लावली आहेत का, लावली असतील तर ती जगली आहेत का आणि त्याची निगा राखली जात आहे का हे तपासलेच जात नसल्याचे उघडकीला आले आहे.

महापालिका बांधकाम पूर्णत्त्वाचा दाखला देत असताना उद्यान विभागाची परवानगी आवश्‍यक असते. त्यासाठी झाडे लावलीत की नाही, याची तपासणी केली जाणे बंधनकारकच आहे. मात्र असे होताना दिसत नाही. याविषयी घोरपडे म्हणाले, उद्यान विभागाकडे कर्मचाऱ्याची कमतरता असल्यामुळे तपासणी करू शकत नसल्याचे घोरपडे म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)