पुणे-निजामउद्दिन नव्हे; आता “दर्शन एक्‍स्प्रेस’

संग्रहित छायाचित्र.....

 

पुणे, दि.27 – पुणे-निजामउद्दिन या वातानुकुलीन रेल्वेचे नाव बदलण्यात आले आहे. त्याऐवजी आता हे नाव आता “दर्शन एक्‍स्प्रेस’ असे राहणार आहे. याबाबत रेल्वे मंत्रालयाने अधिसूचना जारी करुन नाव बदलण्याचे आदेश दिले आहे.
पुण्यातील साधू वासवानी मिशनच्यावतीने काही दिवसापूर्वी ही मागणी करण्यात आली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे याबाबत प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यावर पियुष गोयल यांनी या रेल्वेचे नाव बदलण्यास मंजुरी दिली आहे. यापुढील काळात ही रेल्वेगाडी आता “दर्शन एक्‍स्प्रेस’ या नावाने धावणार आहे. रेल्वेच्या वेळापत्रकात या नावाचा बदल लवकरच करण्यात येणार आहे. रेल्वेवरील नावसुद्धा बदलण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)