पुणे-नाशिक महामार्गावर टायर जाळले

राजगुरूनगर- राजगुरुनगर शहरात शांततेत सुरू असलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनाला अचानक हिंसक वळण लागल्याने परिसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. आंदोलकांनी यावेळी पुणे-नाशिक महामार्गावर टायर जाळात तब्बल दोन तास महामार्ग रोखून धरला. यावेळी भीमाशंकर येथे जाणाऱ्या एसटी बस (एमएच 04 एफसी 1494) ची तोडफोड केल्याने यामध्ये एका महिलेसह तीन जण जखमी झाले आहेत. दरम्यान, या हिंसक आंदोलनामुळे पुणे-नाशिक महामार्ग तब्बल चार बंद असल्याने महामार्गावर पाच ते सहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने प्रवाशांचे मोठे हाल झाले. दरम्यान, राजगुरूनगर शहरात आज कडकडीत बंद पाळण्यात आला.
मराठा समाजाला विविध क्षेत्रात आरक्षण मिळावे यासाठी आज (सोमवारी) राजगुरुनगर येथे खेड तालुका सकल मराठा बांधवांनी मराठी क्रांती ठोक मोर्चा काढीत पुणे नाशिक महामार्गावर दोन तास रस्तारोको केले. ठोक मोर्चाची सुरुवात राजगुरुनगर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून झाली. हजारोंच्या संखेने मोर्चात सहभागी झालेल्या तरुणांनी मोठ्या घोषणा देत राजगुरुनगर शहरातून शांततेत मोर्चा काढला. त्यानंतर मोर्चा पुणे-नाशिक महामार्गावर आल्यानंतर मोर्चाचे रुपांतर रस्तारोको आंदोलनात झाले. सुमारे दोन तास पुणे-नाशिक महामार्ग आंदोलकांनी रोखून धरला.
या आंदोलनात तालुक्‍याचे सकल मराठा समाज ठोक मोर्चा आंदोलनाचे प्रमुख अंकुश राक्षे, शंकर राक्षे, वामन बाजारे, सुदाम कराळे, यांच्यासह सुरेश गोरे, राम गावडे, अतुल देशमुख, शरद बुट्टे पाटील, विजया शिंदे, गणेश सांडभोर, कैलास सांडभोर, कैलास ठाकूर, अरुण चांभारे, सुरेखा मोहिते, शुभम गाडगे, समीर थिगळे, मंगेश सावंत, नानासाहेब टाकळकर, ऍड. अरुण मुळूक, ऍड. अनिल राक्षे, वैभव कर्वे, संतोष सांडभोर, नवनाथ होले, चंद्रकांत इंगवले, ऍड. संतोष दाते, ऍड. कृष्णा भोगाडे, पूजा थिगळे, क्रांती कराळे, अतुल गावडे, कैलास गोपाळे, अमर शिंदे, यांच्यासह तालुक्‍यातील सर्वच ठिकाणावरून आलेले दहा हजारापेक्षा जास्त नागरिक उपस्थित होते. यामध्ये युवकांची संख्या मोठी होती. रस्तारोको दरम्यान मराठा आरक्षणासाठी शहीद झालेल्याना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर राष्ट्रगीत घेऊन आंदोलनाचा समारोप करण्यात आला.

  • विशेष अधिवेशन बोलावून सरकारला आता जाग आली का? आता ठोक मोर्चे सुरू झाले आहेत. खेड तालुक्‍यात अनेक आंदोलने झाली. मात्र त्याला गालबोट लावले नाही. मात्र पोलीस आंदोलकांवर मोठा दबाव टाकत असतील तर ती मोठी शोकांतिका आहे. मराठा समाजाला विविध क्षेत्रात तत्काळ आरक्षण मिळालेच पाहिजे.अन्यथा मराठा समाज गप्प बसणार नाही.
    – अंकुश राक्षे, आंदोलक
  • सकारी, खासगी गाड्यांची तोडफोड
    राजगुरुनगर येथे आज खेड तालुक्‍याच्यावतीने सकल मराठा समाजाचा मराठा क्रांती ठोक मोर्चा व पुणे-नाशिक महामार्गावर रस्तारोको आंदोलन करण्यात आला. या मोर्चात तालुक्‍यातील दहा हजारांपेक्षा अधिक नागरिक सहभागी झाले होते. दरम्यान, युवकांनी गाडीचे टायर पेटविल्याने मोठा तणाव पसरला होता. तर पुणे-नाशिक महामार्गावर चाकण ते राजगुरुनगर दरम्यान असलेल्या सरकारी व खासगी गाड्यांची तोडफोड करण्यात आली.
  • 11 रुग्णवाहिकांना करून दिली वाट
    राजगुरूनगर येथे हिंसक आंदोलना दरम्यान, आंदोलक शांततेचे आवाहन करीत वाहतूककोंडीत अडकलेल्या 11 रुग्णवाहिकांना आंदोलकांनी मार्ग काढून दिल्याने आंदोलकांची माणुसकी जिवंत असल्याचे त्यांनी दाखवून दिली.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)