पुणे – नाशिक महामार्गावरील हिवरगाव पावसा टोलनाक्यावर शिवसैनिकांचं आंदोलन

संगमनेर – श्रीरामपुर पासिंगच्या (एम.एच १७) चारचाकी वाहनांना संगमनेर नजिकचा हिवरगाव पावसा येथील टोलनाक्यावर टोलमाफी देण्यात यावी या प्रमुख मागणीसाठी शिवसेनेने सोेमवारी आंदोलन केले. यावेळी टोलनाक्याच्या केबीनच्या काचा व सुरक्षिततेसाठी लावलेल्या बॅरिकेटस् तोडण्यात आल्या. शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्यासह उत्तर नगर जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.

हिवरगाव पावसा येथील टोलनाक्यावर वाहनांना नाशिकच्या धर्तीवर टोलमाफी दिली जावी, स्थानिकांना रोजगार द्यावा, भुयारी पुल आणि सर्व्हीस रस्त्याचे काम पुर्ण करणे, साईट गटारी आणि स्ट्रीट लाईटची कामे करणे, पादचारी क्रासींग पुल बांधणे, शेतकऱ्यांच्या भाजीपाला व इतर मालवाहतुक करणाऱ्या मालगाड्यांना टोलमाफी मिळावी या मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी दोन तास केलेल्या आंदोलनादरम्यान टोल प्रशासनाला धारेधर धरले होते. तालुकाप्रमुख जनार्दन आहेर, शहरप्रमुख अमर कतारी, माजी शहरप्रमुख आप्पा केसेकर, सोमनाथ कानकाटे, अशोक सातपुते आदी प्रमुख पदाधिकाऱ्यांचा यात समावेश होता.

गेल्याच आठवड्यात जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी टोल प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला होता. प्रशासनाने कोणतीही दखल घेतली नाही, त्यामुळे सोमवारी हे आंदोलन करण्यात आले. अकरा वाजता जमलेल्या शिवसैनिकांनी ठिय्या देत आंदोलन केले. यादरम्यान दोन्ही बाजुंकडील वाहनांकडून टोल आकारणी केली गेली नाही. याच दरम्यान आंदोलनातील काही कार्यकर्त्यांकडून टोल नाक्याच्या मालमत्तेला नुकसान पोहचले गेले. केबीनच्या काचा आणि बॅरिकेटस् तोडण्यात आले. त्यामुळे काही काळ वातावरणात तणाव निर्माण झाला होता.उपअधीक्षक अशोक थोरात, निरीक्षक सुनील पवार, निरीक्षक गोकुळ आैताडे यांच्या नेतृत्वाखाली मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तहसिलदार साहेबराव सोनवणे यांनी आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेत मागणीसंदर्भात २९ एप्रिलला बैठक घेण्याचे आश्वासन दिले तर अन्य मागण्यांना टोल नाका प्रशासनाकडून तोंडी आश्वासन देण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
1 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)