पुणे : नवीन सिमेंट रस्ते, जलतरण तलावांना बंदी

आयुक्तांचे आदेश : पाणी बचतीसाठी कठोर निर्णय


नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचा संकल्प


 दैनिक “प्रभात’ने सर्वप्रथम दिले होते वृत्त

पुणे – शहरातील अनावश्‍यक पाणी वापरावर मर्यादा आणण्यासाठी शहरातील सर्व वॉशिंग सेंटर, खासगी तसेच महापालिकेचे जलतरण तलाव आणि नवीन सिमेंट रस्त्यांची कामे थांबविण्याचे आदेश दिल्याची माहिती महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली. याचा प्रस्ताव आयुक्त राव यांच्या सूचनेनुसार पाणीपुरवठा विभागाने मान्यतेसाठी ठेवला होता. त्यास अखेर आयुक्तांनी मान्यता दिली आहे. महापालिकेकडून ही बंदी घातली जाणार असल्याचे वृत्त सर्वप्रथम दैनिक “प्रभात’ने दिले होते.

खडकवासला धरणसाखळीतील पाणीसाठा लक्षात घेता शहराच्या पाणी पुरवठ्यात कपात करण्याची मागणी जलसंपदा विभागाने केली आहे. कालवा समिती बैठकीतही त्यावर निर्णय झाला आहे. त्यामुळे महापालिकेने दिवाळीपासूनच एकवेळ पाणी देणे सुरू केले आहे. त्यासाठी दरदिवशी सुमारे 1,350 एमएलडी पाण्याची गरज भासते. मात्र, पाटबंधारे विभागाने या पाण्यात कपात करून दररोज 1,150 एमएलडी पाणी पालिकेने घ्यावे, अशी मागणी केली आहे. पालिकेने आताच हे पाणी कमी केले नाही, तर एप्रिल आणि मेमध्ये भीषण स्थिती उद्‌भवेल, असा युक्तीवाद केला जात आहे. मात्र, सध्या सुरू असलेल्या पाण्यापेक्षा पाणी आणखी कमी केल्यास पाणी वितरणात अडचणी येणार असल्याने महापालिका त्यासाठी तयार नाही. त्यामुळे शहरात अनावश्‍यक रितीने सुरू असलेला पाणी वापर तसेच पाणी चोरी रोखण्यासाठी कडक उपाय करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. त्या अंतर्गत आता नवीन सिमेंटचे रस्ते, वॉशिंग सेंटर तसेच सर्व प्रकारचे जलतरण तलाव बंद ठेवले जाणार आहेत. या शिवाय, महापालिकेकडून शहरातील पाणी खेचण्याच्या मोटारी शोधण्याची विशेष मोहीम हाती घेतली जाणार असून अनधिकृत नळजोडही तपासले जाणार असल्याचे आयुक्तांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गृहप्रकल्पांसाठी सांडपाणी शुद्धीकरण केंद्रातील पाणी
आयुक्तांनी दिलेल्या सूचनेनुसार, शहरात यापुढे नव्याने काम सुरू करण्यात येणाऱ्या सिंमेट रस्त्यांना बंदी घातली जाणार आहे. तर ज्या रस्त्यांचे काम सुरू आहे. तसेच ज्या गृहप्रकल्पांचे काम सुरू आहे, त्यांनी महापालिकेच्या सांडपाणी शुद्धीकरण केंद्रातील पाणी वापरणे बंधनकारक केले जाणार आहे. पालिकेच्या उद्यानांसाठीही हेच पाणी वापरले जाणार आहे. दरम्यान, या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनास सूचना देण्यात आलेल्या असून त्याची कडक अंमलबजावणी केली जाणार असल्याचे आयुक्त राव यांनी स्पष्ट केले. tank

यांना असेल पूर्ण बंदी
-नवीन सिमेंटचे रस्ते
-सर्व वॉशिंग सेंटर
– खासगी व पालिकेचे जलतरण तलाव

यांना वापरता येणार नाही पिण्याचे पाणी
– सुरू असलेली सर्व बांधकामे
– सुरू असलेले सिमेंट रस्ते बांधकाम
– महापालिकेची सर्व उद्याने

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)