पुणे – नगरसेविका किरण जठार यांचे नगरसेवकपद रद्द

पुणे – प्रभाग क्रमांक 1 “अ’च्या नगरसेविका किरण जठार यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरविण्यात आले आहे. यामुळे महापालिका आयुक्तांनी त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याच्या प्रस्तावावर स्वाक्षरी केली आहे. यामुळे आता जठार यांचे नगरसेवकपद रद्द करण्यात आले आहे. त्यांनी आतापर्यंत घेतलेल्या आर्थिक लाभ वसूल केले जाणार आहे.

जठार यांनी प्रभाग क्रमांक 1 “अ’मधून अनुसूचित जाती या आरक्षित प्रवर्गातून निवडणूक लढवली होती. त्यांचे जात प्रमाणपत्र जात पडताळणी विभागाने अवैध ठरवल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने त्यांचा अर्ज निकाली काढला आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार 6 महिन्यांत जात पडताळणी प्रमाणपत्र देणे आवश्‍यक आहे. राज्य शासनाने ही मुदत वाढवून 12 महिने केली जात. या कालावधीतही जठार यांनी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर केले नसल्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)