पुणे – ध्वजारोहनाला दांडी कर्मचाऱ्यांना पडणार महागात

पुणे – महाराष्ट्र दिनानिमित्त महापालिका भवनाच्या प्रांगणात साजरा करण्यात आलेल्या ध्वजारोहण समारंभाला मारलेली दांडी महापालिकेच्या मुख्य इमारतीमधील कर्मचाऱ्यांना चांगलीच महागात पडणार आहे. कर्मचाऱ्यांच्या या अनुपस्थितीची गंभीर दखल प्रशासनाने घेतली असून अतिरिक्त आयुक्त रूबल अग्रवाल यांनी अनुपस्थितीत राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना सक्त ताकीद देऊन या अनुपस्थितीची नोंद त्यांच्या सेवा पुस्तकात करण्याचे आदेश दिले आहेत.

शासनाच्या आदेशनुसार सर्व अधिकारी, कर्मचाऱ्यांनी 26 जानेवारी, 1 मे आणि 15 ऑगस्ट (स्वातंत्र्य दिन) यानिमित्त होणाऱ्या ध्वजारोहण समारंभास उपस्थित राहणे बंधनकारक आहे. परंतु बुधवारी (दि.1 मे) महापालिकेतील ध्वजारोहणसाठी तीन ते चार हजार अधिकारी, कर्मचाऱ्यांपैकी केवळ 400 ते 500 अधिकारी, कर्मचारी उपस्थित असल्याचे निदर्शनास आले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.