पुणे -‘धावत्या’ आंदोलनाला आडकाठी!

पोलीस भरती प्रक्रियेतील बदलाने युवक संतापले


मुंबईकडे धावत जाणाऱ्या तरुणांना खडकीत थांबविले


शहरातही डेक्‍कन ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आंदोलन

पुणे – पोलीस शिपाई या पदाच्या भरतीप्रक्रियेत करण्यात आलेले नवीन बदल रद्द करुन जुन्याच निकषानुसार परीक्षा घेण्यात यावी, या मागणीसाठी पुण्यात शुक्रवारी नदीपात्रातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. या मोर्चेकऱ्यांमधील काही तरुण हे आपल्या मागण्यांचे निवेदन घेऊन मुंबईला धावत निघाले आहेत. 11 फेब्रुवारी रोजी ते मुंबईतील आझाद मैदान येथे पोहचणार आहेत. दरम्यान, या तरुणांना खडकी पोलिसांनी अडवून धरले.

यंदाच्या पोलीस भरतीतील नियमांमध्ये राज्य शासनाने बदल केले आहेत. यानुसार पहिल्यांदा 100 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येणार असून त्यातर 1:5 याप्रमाणे शारीरिक क्षमता चाचणीस उमेदवार पात्र ठरविण्यात येणार आहेत. ही चाचणी ही फक्त 50 गुणांची होणार आहे. त्यामुळे राज्यातील पोलीस दलास शारीरिकदृष्ट्या सक्षम उमेदवारांची उपलब्धता होण्याबाबत शंका आहे. हा निकष परीक्षेच्या अगदी तोंडावर बदलल्याने वर्षानुवर्षे तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये चिंतेचे व नैराश्‍याचे वातावरण आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पोलीस शिपाई पदासाठी अनेक बारावी पास उमेदवारांनी अर्ज केले आहेत. नव्या निकषानुसार परीक्षा झाल्यास स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे अनेक उमेदवार लेखी परीक्षेत उत्तीर्ण होतील, अशी शक्‍यता हे तरुण व्यक्त करत आहेत. तसेच जे उमेदवार वर्षानुवर्षे “फिटनेस’साठी मेहनत घेतात, त्या विद्यार्थ्यांना डावलने जाण्याची भीती या मोर्चेकऱ्यांना सतावत आहे. त्यामुळे सरकारने जुन्याच निकषांनुसार आधी शारीरिक चाचणी घ्यावी व नंतर लेखी परीक्षा घ्यावी, अशी मागणी उमेदवारांनी केली आहे. दरम्यान, या उमेदवारांनी शांततेच्या मार्गाने सुरू केलेल्या आंदोलनाला पोलिसांनी आडकाठी घातल्याची भावना व्यक्‍त होत आहे.

“ते’ तरुण ठिय्या आंदोलनात सहभागी होणार
पोलीस शिपाई भरतीच्या निकषाच्या विरोधात पुण्यातून मुंबईकडे निघणाऱ्या उमेदवारांना खडकी पोलिसांनी रोखले. तुम्ही कोणतेही परवानगी न घेतल्याच्या कारणावरून उमेदवारांना मुंबईकडे जाण्यास मज्जाव करण्यात आला. या उमेदवारांना पोलिसांनी सणस मैदानावर थांबण्यास सांगितले. दरम्यान, पोलिसांच्या या कृतीचा निषेध म्हणून उमेदवारांनी शुक्रवारपासून जिल्हाधिकारी कार्यालसमोर सुरू होणाऱ्या ठिय्या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)