पुणे : दुचाकीस्वारांनी महिलेची पर्स लांबवली

पुणे- रस्त्यावर पतीची वाट पाहात थांबलेल्या महिलेजवळील पर्स दुचाकीवरून आलेल्या दोघांनी जबरदस्तीने चोरून नेली. ही घटना शिवाजीनगर येथील जंगली महाराज रोडवर सोमवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दोघा चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी 42 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला ही जळगाव येथून पुण्यात आली होती. यानंतर जंगली महाराज रोडवर पतीची वाट पाहात उभी होती. यावेळी अचानक दुचाकीवरून दोघेजण महिलेच्या जवळ आले व हातातील लेदर पर्स हिसका मारून चोरून नेली. यामध्ये 80 हजार रोख रक्कम व महत्त्वाची कागदपत्रे चोरीला गेली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी अधिक तपास शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एस. एस. काळे करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)