पुणे – “त्या’ भगिनींसाठी पुण्यात कॅंडल मार्च

– घटनेतील नराधमांना फाशी झालीच पाहिजे

पुणे – हिंजवडीतील संत तुकाराम महाराज सहकारी साखर कारखाना, कासारसाई येथे गेल्या पंधरवाड्यात उसतोड कामगारांच्या अल्पवयीन मुलींवर बलात्कार केलेल्या नराधमांना फाशी झाली पाहिजे, तसेच उज्वल निकम यांसारख्या तज्ञ सरकारी वकीलाची नियुक्ती करुन हा खटला जलदगती न्यायालयात चालावा, याचबरोबर पिडीत कुटुंबियांना शासनाने लवकरात लवकर अर्थिक मदत द्यावी या मागण्यांसाठी नदीपात्र परिसरात शहरातील तरुण, तरुणींनी एकत्र येत “कॅंडल मार्च’ आयोजित केला होता. सुमारे तीन ते साडेतीन हजार महिला आणि पुरुषांनी हातात कॅंडल घेऊन यामध्ये सहभाग घेतला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गेल्या पंधरवाड्यात हिंजवडी, कासारसाई येथील दुर्घटनेत एका मुलीचा मृत्यू झाला. तर दुसरी मुलगी औषधोपचारार्थ रुग्णालयात दाखल आहे. या घटनेत मृत्यू झालेल्या मुलीला श्रद्धांजली वाहण्यासाठी शहरातील नदीपात्रात कॅंडल मार्चचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांनी घटनेचा निषेध करुन पिडीत कुटुंबियांना शासनाने मदत करण्याची मागणी केली.
रविवारी सायंकाळी नदीपात्रातील भिडे पुल येथून कॅडल मार्चचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नदीपात्र परिसरात कॅंडल लावून दुर्घटनेत मृत्यू झालेल्या मुलीस श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी अनिल गिते, सतीश बडे, डॉ. तेजस्विनी गधाले, कोमल पाटील, मनिषा सानप, शंकर खेडकर, संतोष कांदे, बालाजी फड, कानिफ पालवे, सचिन बडे आदींसह तरुण- तरुणींनी सहभाग घेतला. अशोक मुंडे, रवि खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली याचे आयोजन करण्यात आले होते.

ऊसतोड कामगारांच्या मुला-मुलींसाठी साखर कारखाना परिसरात कायमस्वरूपी साखर शाळा सुरु करण्यात याव्यात. तसेच मुलांच्या शिक्षणाची व्यवस्था करावी, ज्या ठिकाणी उसतोड कामगार जातात त्याठिकाणी त्यांची राहणे, स्वच्छतागृह आदींची व्यवस्था नसल्याने मोठी अडचण होते. यामुळे शासनाने उसतोड कामगारांच्या या मुलभुत प्रश्‍नांकडे लक्ष देण्याची गरज असल्याची मागणी रवि खेडकर यांनी केली.
——————————

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)