पुणे – डॉ. बाबासाहेब म्हणजे विश्‍वाला लाभलेली महान देणगी

महामानवास महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांचे अभिवादन

पुणे – “डॉ. आंबेडकरांनी भविष्याचा वेध घेत राष्ट्राच्या उभारणीकडे पाहिले. अशा या महामानवाचे कार्य म्हणजे देश आणि समाजासाठी आजही प्रेरणादायी ठरेल असेच आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणजे या विश्‍वाला लाभलेली महान देणगी आहे, अशा शब्दांत महायुतीचे उमेदवार गिरीश बापट यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आदरभाव व्यक्त केला.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त शहारातील विविध भागात झालेल्या कार्यक्रमांमध्ये गिरीश बापट उपस्थिती नोंदविली. यावेळी आमदार माधुरी मिसाळ, महापौर मुक्ता टिळक, नगरसेवक अजय खेडेकर, उमेश गायकवाड, प्रियांका श्रीगिरी, रुपाली बिडकर,अतुल गायकवाड, शहर अध्यक्ष योगेश गोगावले, आरपीआयचे शहर अध्यक्ष अशोक कांबळे, परशुराम वाडेकर, मंदार जोशी, शैलेंद्र बिडकर, दिलीप गिरीमकर यांच्यासह स्थानिक नगरसेवक आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त झालेल्या विविध कार्यक्रमात बापट सहभागी झाले. यामध्ये बी. जे. मेडिकल कॉलेज तसेच कॅम्पमधील बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांनी अभिवादन केले. त्यानंतर सम्यक ट्रस्ट, दांडेकर पुलाजवळील विवेकानंद तरुण मंडळ, अजिंक्‍य तरुण मंडळने उभारलेल्या बाबासाहेबांच्या प्रतिकृतीला त्यांनी अभिवादन केले. तर लंडन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घराची प्रतिकृतीचेही यावेळी बापट यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले.

मार्केटयार्ड बाजारपेठेचा कायापालट करणार
पालकमंत्री या नात्याने मार्केटयार्ड बाजारपेठेतील काही प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावल्याची संधी मिळाली. परंतु, अजूनही येथील कचऱ्याचा, रस्त्याचा प्रश्‍न तसेच फुलबाजारासाठी स्वतंत्र इमारत यासारख्या समस्या मला सोडवायच्या आहेत. भविष्यात मार्केटयार्ड बाजारपेठेचा संपूर्ण कायापालट करण्यासाठी मी प्रयत्नशील असेन, अशी ग्वाही गिरीश बापट यांनी व्यापाऱ्यांना दिली.

निवडणुकीच्या प्रचारार्थ गुलटेकडी मार्केटयार्ड येथे पदयात्रा काढून येथील व्यापारी, अडते, ग्राहक, तोलाईवाले, कामगार व कष्टकरी वर्गाशी बापट यांनी संवाद साधला. यावेळी मनपा सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, नगरसेवक रघुनाथ गौडा, प्रवीण चोरबेले, महेश वाभळे, राजश्री शिळीमकर, अजय खेडेकर, महेश लडकत, कविता वैरागे, शिवलाल भोसले, विलास भुजबळ, राजू कोरपे, गणेश घुले, गौरव घुले आदी उपस्थित होते.

खडकी येथे कचेरीचे उद्‌घाटन
नागरिकांना किफायतशीर व दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी आवश्‍यक उपाययोजना करण्याचे आश्‍वासन बापट यांनी दिले. खडकी परिसरात बापट यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या प्रचारफेरीची सांगता व निवडणूक मध्यवर्ती कचेरीचे उद्‌घाटन करताना बापट बोलत होते. आमदार विजय काळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.