पुणे – डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त वाहतुकीत बदल

पुणे – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमामुळे वाहनचालकांची गैरसोय होऊ नये, तसेच जयंती कार्यक्रम सुरळीत पार पडावेत यासाठ शहरातील विविध भागात वाहतूक बदल करण्यात आला आहे. विशेषतः जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, विश्रांतवाडीत बदल करण्यात आले आहेत. हे बदल रविवारी सायंकाळी 4 वाजेपासून गर्दी संपेपर्यंत असतील.

शहरात मोठ्या प्रमाणात डॉ. आंबेडकर जयंती साजरी करण्यात येते. विविध संस्था, संघटनांकडून मिरवणूका काढण्यात येतात. या पाश्वभूमीवर बदल करण्यात आले असून पर्यायी मार्गांची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील बोल्हाई चौकातून पुणे स्टेशनकडे, साधू वासवानी चौकाकडे, जी.पी.ओ चौकाकडून डॉ. आंबेडकर पुतळ्याकडे, चर्च रोडवरील समाजकल्याण चौकातून मुद्राणालय रोडने फोटो झिंको प्रेसकडे जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. तर, अरोरा टॉवर समोरील दोराबजी चौकातून अरोरा टॉवरकडे येण्यासाठी सर्व प्रकारच्या वाहनावर बंदी घालण्यात आली असून या वाहनचालकांनी दोराबजी ब्ल्यू नाईलकडून पुढे जावे. सदरच्या परिसरातून अरोरा टॉवरकडे येणाऱ्या काही मार्गावर बंदी घालण्यात आली असून पर्यायी मार्गाची सोय उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

विश्रांतवाडी परिसरात पुण्याकडून एअरपोर्ट, टिंगरेनगरकडे जाणाऱ्या वाहनांनी मेंटल हॉस्पिटल कॉर्नर चौकातून उजवीकडे वळून कॉमर झोन चौकातून डावीकडे वळून टिंगरेनगर एअरपोर्टकडे जातील. तर, पुण्यातून बोपखेल, दिघी, भोसरी, आळंदीकडे जाणारी वाहने शांतिनगर चौकातून डावीकडे वळसा घेऊन पर्यायी कच्च्यामार्गाचा वापर करुन कळस फाटा येथे आळंदी रोडला जावे. तर, दिघी, आळंदीकडून पुण्याकडे येणाऱ्या वाहनांनी कळसफाटा येथून टॅंकरोडने उजवीकडे वळून चव्हान चाळीत जाऊन पर्यायी कच्च्यामार्गाचा वापर करुन खडकीकडे यावे.

या शिवाय मिरवणूक मार्गावरील वाहतूक गरजेणूसार टप्याटप्याने बंद अथवा इतर पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. तरी वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करुन होणारी गैरसोय टाळावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.