पुणे -‘जेट एअरवेज’मुळे प्रवाशांचा खोळंबा

आंतरराष्ट्रीय उड्डाणेही 30 मार्चपर्यंत रद्द


सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप

पुणे – “जेट एअरवेज’ची अनेक उड्डाणे दिवसेंदिवस रद्द करण्यात येत आहेत. सध्या केवळ मुंबई आणि दिल्लीमध्ये उड्डाणे होत आहेत. याशिवाय अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणेही 30 मार्चपर्यंत रद्द करण्यात आली असून प्रवाशांमध्ये अन्य उड्डाणांबाबतही प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे.

“जेट एअरवेज’ ही कंपनी काही महिन्यांपासून आर्थिक संकटामध्ये आहे. त्याचा परिणाम अनेक उड्डाणांवर होत आहे. काही महिन्यांपूर्वी पुण्यातून जेट एअरवेजची दैनंदिन 21 उड्डाणे होत होती. मात्र, यातील अनेक उड्डाणे रद्द करण्यात येत आहेत. या कंपनीकडून सध्या केवळ चार ठिकाणी सेवा पुरविली जात होती. त्यामध्ये दिल्ली, मुंबई, अबुधाबी आणि सिंगापूरचा समावेश होता.

या अचानक रद्द केलेल्या उड्डाणांमुळे प्रवाशांना फटका बसत आहे. त्याचबरोबर दि.30 मार्चनंतर होणाऱ्या उड्डाणांबाबत नागरिकांच्या मनात साशंकता आहे. अनेक प्रवाशांनी याबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून संताप व्यक्त केला. यासह याचा परिणाम विमानांच्या तिकीट दरावर झाल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात येत आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.