पुणे जिल्हा: भाऊ-बहिणींवर शोकाकुल वातावरणात अत्यसंस्कार

घोड नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू : शिनोली-नारोडी गावावर शोककळा

मंचर – शिनोली ( ता.आंबेगाव ) येथील घोडनदी काठावर मुक्ताई देवीच्या दर्शनासाठी गेलेल्या बहिणीसह भाऊ मंगळवारी (दि. 29) सायंकाळी बुडून मृत्यू झाला होता. त्यातील बहिणींचा मृतदेह मंगळवारीच तर भावाचा मृतदेह (बुधवारी) सकाळी सापडला. या तिघांवर आज शोकाकूल वातावरणात शिगोली आणि नारोडी येथे अत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, या घटनेमळे नारोडी आणि शिनोली गावावर शोककळा पसरली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

उन्हयाळ्याची सुट्टी लागल्याने तेजल विकास हुले (वय 10) प्रज्वल विकास हुले (वय 14 दोघे, रा. नारोडी) ही दोन्ही सखी भांवडे आपल्या मावशीकडे शिनोली येथे आले होते. ते मंगळवारी दुपारी अंकिता आपली आई उषा बोऱ्हाडे व मावसबहिण भाऊ तेजल व प्रज्वल यांच्याबरोबर डिंभे धरणाकडे फिरण्यास गेले होते. तेथून ते सर्व जण घरी माघारी परतले सायंकाळी पावणेसहाच्या नंतर मुक्‍ताई देवीच्या दर्शनासाठी अंकिता, तेजल व प्रज्वल घोडनदीच्या तिरावर गेले. देवदर्शन करण्याच्या अगोदर हातपाय धूण्यासाठी नदीच्या पात्रात गेले असता, पाण्याचा अंदाज न आल्याने एकमेकांना वाचविताना पाय घसरून पाण्यात पडले व वाहून गेले मूले अंधार पडला तरी न आल्याने घरच्यांनी चौकशीला सुरुवात केली असता. तेथील मोहिनी सोमवंशी यांनी सांगितले की, तिधे जण मुक्ताई देवीच्या देर्शनासाठी गेल्याचे मी पाहिले. त्या तिघाचा शोध घेण्यासाठी संबंधीत कुंटुब नदीवर गेले असता. तेथे त्याना मूलांच्या चपला आढळल्या तेथून काही अंतरावर अंकिता आणि तेजलचा मृतदेह मिळून आला. तसेच प्रज्वलचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता अंधार पडल्याने त्याचा शोध घेता आला नाही. आज सकाळी साडेसहाच्या सुमारास प्रज्वलचाही मृतदेह मिळाला.
घोडेगाव ग्रामीण रुग्णालयात तिनही मुलांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात मृतदेह देण्यात आले. शिनोली येथील स्वामी समर्थ पतसंस्थेचे सचिव अनिल बोऱ्हाडे यांची मुलगी अंकिता लोणी काळभोर येथे फूड टेक्‍नॉलॉजीच्या पहिल्या वर्षात शिकत होती. तर बी.एस.टी. मुंबई येथे नोकरीसाठी कार्यरत असलेले विकास हुले यांची मूलगी तेजल डिलॅक्‍स कॉलेज पनवेल येथे बी.एसी आय.टी दुसऱ्या वर्गात शिकत होती तर प्रज्वल हुले हा नेरूळ नवी मुंबई येथे सेंट जेव्हेर्स विद्यालयात इयत्ता सातवीत शिक्षण घेत होता. पुढील तपास घोडेगाव पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक किरण भालेकर करीत आहे.
सोबत – प्रज्वल, अंकिता, तेजल यांचे आयकार्ड साईज फोटो पाठविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)