पुणे जिल्हा: बांधकाम व्यावसायीकांचे योगदान मोलाचे

बारामती येथे अजित पवार यांचे प्रतिपादन

बारामती – शहराच्या सर्वांगिण विकासामध्ये बांधकाम व्यावसायिकांचे योगदान मोलाचे आहे, या पुढील काळातही बारामतीच्या वैभवात भर घालण्याचे काम बांधकाम व्यावसायिकांनी करावे, अशी अपेक्षा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्‍त केली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

बारामती येथील बिल्डर असोसिएशन ऑफ इंडियाच्या बारामती शाखेचा पदग्रहण समारंभ अजित पवार यांच्या उपस्थितीत नुकताच झाला, त्याप्रसंगी ते बोलत होते. बिल्डर असोसिएशनचे राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रताप साळुंके, विश्‍वस्त विजय देवी, गव्हर्निंग कौन्सिल सदस्य संजय संघवी, बारामती बॅंकेचे अध्यक्ष श्रीकांत सिकची, नगरपालिकेचे गटनेते सचिन सातव, नगरसेवक जयसिंग देशमुख, बिल्डर असोसिएशनचे राज्याचे माजी अध्यक्ष मनोज पोतेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी अध्यक्ष : सुनील देशमुख, सचिव : आदेश शहा-वडूजकर, सहसचिव : अविनाश लगड, सचिन पहाडे यांनी पदग्रहण केले. याप्रसंगी अजित पवार यांनी बारामती शहराच्या विविध विकासकामांबाबत सविस्तर आढावा घेतला. शहराच्या विविध विकासकामांमध्ये बांधकाम व्यावसायिकांनीही पुढील काळात मदत करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्‍त करीत राज्य शासनाच्या विविध धोरणांवर त्यांनी टीका केली. याप्रसंगी मावळते अध्यक्ष राजेंद्र खराडे यांनी आढावा सादर केला तर नूतन अध्यक्ष सुनील देशमुख यांनी पुढील वर्षात करायच्या कामकाजाबाबत माहिती दिली. आदेश वडूजकर यांनी आभार मानले. याप्रसंगी संस्थेचे सदस्य किशोर मेहता, आशपाक सय्यद, दत्तात्रय बोराडे, चंद्रकांत शिंगाडे, विजय सोळसकर, सुरेंद्र भोईटे, शामराव राऊत, दीपक काटे, उद्धव गावडे याप्रसंगी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)