पुणे जिल्हा: पवारांचा पारा चढला, अधिकाऱ्यांची केली कानउघडणी

इथं नेहमीचंच…
रुग्णालयात डॉक्‍टरच उपलब्ध नसल्याची तक्रार काही जणांनी केली. यावर हा प्रकार इथं नेहमीचाच असल्याचे पुटपुटत आमदार अजित पवार तावातावने जिना उतरून निघून गेले. ही बाब नंतर काहींनी रूग्णालयातील डॉक्‍टरांच्या लक्षात आणून दिली.

वैद्यकीय अधीक्षक अनुपस्थित…
आमदार अजित पवार उपमुख्यमंत्री असताना सर्व अधिकारी ते येणार असल्याचे कळताच आपापल्या जागेवर उपस्थित रहायचे. मात्र, सत्तांतर झाल्यानंतर सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालयात ते आले असतानाही वैद्यकीय अधीक्षक अनुपस्थिती होते.

रूग्णालय प्रशासनाला निधी देवू शकत असल्याबाबत दिली जाणीव करून

बारामती – पिंपळी येथील वादळात जखमी झालेल्या रुग्णांना भेटण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अजित पवार सिल्व्हर ज्युबिली उपजिल्हा रुग्णालयात गेले होते, त्यावेळी रुग्णालयाच्या इमारतीच्या रंगाचे पोपडे पडलेले त्यांनी पहिले. त्यानंतर त्यांचा पारा चढला, त्यांनी येथील अधिकाऱ्यांची कानउघडणी करीत डागडुजीकरिता सांगत जा, आपणही पूर्वी निधी देत होतो, आम्ही अजून बेकार झालेलो नाही, असे सांगत अजून आपली निधी देण्याची पत असल्याची जाणीव प्रशासनाला करून दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वादळात जखमी झालेल्या नागरिकांच्या आरोग्याची चौकशी करण्यासाठी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे आमदार अजित पवार हे सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात गेले होते. नेहमीप्रमाणे गाडीतून उतरून ते थेट रुग्ण दाखल असलेल्या वार्डात पोहोचले. यानंतर रुग्णांच्या अंगावर रुग्णालयाचा वेष पाहून ते म्हणाले की, रुग्णालय प्रशासन, रूग्णांना असेच कपडे नेहमी देते. की, आपण येणार असल्याचे समजल्याने दिले आहेत. नेहमी अशा सुविधा रुग्णालय सर्व रुग्णांना दिल्या जातात का, याचीही खातरजमा पवार यांनी करून घेतली. यानंतर रुग्णालयाबाहेर पडत असताना त्यांचे लक्ष रंग गेलेल्या भिंतींसह इमारतीच्या छताकडे गेले. छतावरील रंगांचे उडालेले पोपडे व भिंतींचा गेलेला रंग पाहून अधिकाऱ्यांवर पवार चांगलेच भडकले. या अधिकाऱ्यांची कानउघडणी करीत आपण यापूर्वी निधी देत होतो. डागडुजीसाठी किमान सांगत तरी जा, आम्ही अजून बेकार झालेलो नसल्याचे सांगत आपली निधी देण्याची पत आजही अबाधित असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)