पुणे जिल्हा : जिल्ह्यातील पोलीस पाटलांचे मानधन झाले जमा

नवनियुक्‍त पोलीस पाटलांनी व्यक्‍त केले समाधान

नीरा – नवनियुक्‍त पोलीसा पाटलांचे मानधन तीन महिन्यांनंतरही जमा न झाल्याने याबद्दलचे वृत्त दैनिक “प्रभात’ने प्रसिद्ध केले होते. या नंतर पोलीस प्रशासनाच्यावतीने काल पोलीस पाटलांच्या खात्यावर दोन महिन्यांचे मानधन जमा करण्यात आले असून पहिलेच मानधन मिळाल्याने पोलीस पाटलांनी समाधान व्यक्‍त केले आहे.

सध्या महिला पोलीस पाटलांची नियुक्‍ती मोठ्या संख्येने झाली आहे. महिलांना काम करताना अनेक अडचणी येतात. कायद्याचे ज्ञान त्यांना असणे आवश्‍यक आहे. त्याचबरोबर गावपातळीवरील समस्या व त्यांचे निवारण कसे करावे यासंदर्भात मार्गदर्शन होणे आवश्‍यक आहे. आणि म्हणूनच जेजुरी पोलीस ठाणे व मासूम संस्थेच्यावतीने या मार्गदर्शन आयोजित केले आहे. याचा लाभ नवीन पोलीस पाटलांना काम करताना होईल.
– डी. एस. हाके, पोलीस निरीक्षक, जेजुरी

राज्यात गावकामगार पोलीस पाटलांच्या रिक्‍त जागांवर नव्याने नियुक्‍त्या करण्यात आल्या आहेत. नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्यात नियुक्‍त केलेल्या पोलीस पाटलांचे मानधन तीन महिन्यानंतरही दिले गेले नव्हते. त्यामुळे नव्यानेच आलेल्या पोलीस पाटलांमध्ये मानधना बाबत संभ्रम निर्माण झाला होता. याबाबत दैनिक “प्रभात’ने आवाज उठवला होता.

त्याचबरोबर नवनियुक्‍त पोलीस पाटलांना कोणतेही प्रशिक्षण न दिल्याचा मुद्दाही मांडला होता. याबाबत जेजुरी पोलीस ठाण्याच्या वतीने पुढाकार घेण्यात आला असून येत्या गुरवारी जेजुरी पोलीस ठाणे व मासूम संस्थेच्या संयुक्‍त विद्यमाने सकाळी 10.30 ते 11.30 दरम्यान गावपातळीवरील प्रश्‍न सोडवताना पोलीस पाटलाची भूमिका व स्त्री-पुरुष समानता या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. भोर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव व मिलिंद चव्हाण यावेळी मार्गदर्शन करणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)