पुणे जिल्हा: जिजामाता विद्यालयाची निकालाची परंपरा कायम

वाणिज्य, विज्ञान, बॅंकिंग विभागाचा निकाल शंभर टक्के

जेजुरी – महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल ऑनलाइन पद्धतीने आज (दि. 30) जाहीर झाला. जेजुरी (ता. पुरंदर) येथील जिजामाता हायस्कूल ऍण्ड ज्युनिअर कॉलेज या विद्यालयाचा निकाल 97.35 टक्के लागला. विद्यालयाचा वाणिज्य, विज्ञान, बॅंकिंग या तीन शाखांचा निकाल 100 टक्के लागला असून, कला शाखेचा निकाल 89.41 टक्के लागला आहे. विद्यालयातील प्रथम तीन क्रमांक पुढील प्रमाणे कला शाखा- मेघा नंदकुमार गोसावी (86 टक्के – प्रथम),ओंकार लक्ष्मण बोडके (82.15 टक्के – द्वितीय), ऋतुजा गोरख यादव (78 टक्के – तृतीय). विज्ञान शाखा – अक्षय भानुदास मेमाणे (80 टक्के – प्रथम), प्रज्ञा प्रवीण कुदळे (75.38 टक्के – द्वितीय), चेतन मोहन नातू (71.84 टक्के – तृतीय). कॉमर्स शाखा – मनीषा गोरख चौधरी (83.23 टक्के – प्रथम), रुपाली सुरेश फाळके (82.61 टक्के – द्वितीय), स्नेहल दिगंबर सस्ते (82.30 टक्के – तृतीय). बॅंकिंग शाखा- ऋतुजा रमेश जाधव (71.53 टक्के – प्रथम), अंकिता लक्ष्मण मदने (69.69 टक्के – द्वितीय), विशाल रमेश जगदाळे (69.23 टक्के – तृतीय).

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

विद्यालयातून 310 विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले होते. त्यातील 302 विद्यार्थी उतीर्ण झाले असल्याची अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य नंदकुमार सागर, उपप्राचार्य किरण मोडक, प्रल्हाद गिरमे यांनी दिली. वरील विद्यार्थांना ज्युनिअर विभाग प्रमुख पांडुरंग भांड, प्रा. जयसिंग वसावे, संदीप भोंग, अमोल राणे, वैष्णवी पवार, रेहाना पठाण, श्वेतांबर बेलसरे, मधुसूदन जगताप, पूनम बाठे, सचिन निकुडे, गौरी गाडे, शोभा शिंदे यांनी मागदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)