पुणे जिल्हा: गेल्या तीन वर्षांत स्त्री-भ्रूण हत्येत वाढ

सुप्रिया सुळे, केडगाव येथे डायलेसिस सेंटर सुरू

केडगाव – मागील तीन वर्षांत स्त्री-भ्रूणहत्येत महाराष्ट्रात वाढ झाली असून 21 व्या शतकात असे चित्र दुर्दैवी आणि धक्कादायक आहे. या प्रकाराला आळा घालण्यात आला पाहिजे, असे मत बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

केडगाव (ता. दौंड) येथील मयुरेश्वर रूरल रुग्णालयात रोटरी डायलेसिस सेंटरच्या उद्‌घाटनपर कार्यक्रमात त्या आज (दि. 30) बोलत होत्या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी तालुक्‍याचे आमदार राहुल कुल होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार रमेश थोरात भीमा, कारखान्याचे माजी उपअध्यक्ष आनंद थोरात, रोटरीचे अभय गाडगीळ, अनिल शितोळे, अनुजा शितोळे, राष्ट्रवादी पक्षाचे तालुका अध्यक्ष अप्पासाहेब पवार, महिला जिल्हा अध्यक्षा वैशाली नागवडे, पंचायत समितीचे सभापती झुंबर गायकवाड, महिला बाल कल्याण सभापती राणी शेळके, आणि डॉ. भरत खळदकर, विशाल खळदकर, माजी संचालक दत्तात्रय खळदकर आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

सुपिय्रा सुळे पुढे म्हणाल्या की, आज राज्यात दोन लाख लोकांना डायलसिसची आवश्‍यकता आहे; परंतु प्रत्यक्षात 15 हजार लोकांनाच मदत मिळते. विकासकामे एक वेळ नाही झाली तरी चालेल; परंतु आरोग्यसेवा ही सर्वांची गरज आहे.समाजात आजही कुपोषण, ऍनिमियाचे प्रमाण अधिक आहे, व्यसनामुळे समाजाचे मोठे नुकसान होत आहे. यापासून समाज मुक्त होणे काळाची गरज आहे. नीती आयोग स्थापन करण्यात आला; परंतु स्त्रीभ्रूणहत्या थांबल्या नाहीत. मागील तीन वर्षात त्याचे प्रमाण वाढले असून या घटना चिंताजनक आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)