पुणे जिल्हा : गळफास घेऊन एकाची सणसवाडीत आत्महत्या

शिक्रापूर- सणसवाडी (ता. शिरूर) येथे एका 38 वर्षीय व्यक्‍तीने घरातील छताला लावलेल्या पंख्याच्या हुकाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना आज (गुरुवारी) सायंकाळी घडली असून शिक्रापूर पोलीस ठाण्यात येथे आकस्मात मृत्यू प्रकरणी नोंद करण्यात आली असून आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही.

नानासाहेब काळूराम कोतवाल (रा. सणसवाडी ता. शिरूर) असे आत्महत्या केलेल्या व्यक्‍तीचे नाव आहे, तर योगेश फुलचंद कोतवाल (रा. अष्टापूर ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार दत्तात्रय शिंदे हे करत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)