पुणे जिल्हा : कुरणेवाडी गैरव्यवहार, शुक्रवारी अंतिम सुनावणी

बारामती – तालुक्‍यातील कुरणेवाडी या ग्रामपंचायतीच्या गैरव्यवहारासंदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दि. 19 व 20 रोजी जिल्हा परिषदेत सुनावणी आयोजित केली होती; मात्र या सुनावणीस जाबदार हे उपस्थित न राहिल्यामुळे पुन्हा येत्या 27 एप्रिल रोजी शेवटची व अंतिम सुनावणी पुणे जिल्हा परिषदेत ठेवण्यात आली आहे.

या सुनावणीस अर्जदार, जाबदार, विद्यमान ग्रामसेवक, तत्कालीन ग्रामसेवक व चौकशी अधिकारी यांना उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. या प्रकरणात गटविकास अधिकारी यांनी दिलेला प्रथम अहवाल मान्य करण्यात येत आहे. नियोजित सुनावणीवेळी जाबदार यांनी आपले म्हणणे मांडले नाही तर, सुनावणीची कार्यवाही अंतिम करण्यात येईल (आपलेकडील अहवाल) असेही या पत्रात स्पष्ट करण्यात आले आहे.

गटविकास अधिकारी व चौकशी अधिकारी यांच्याकडून चौकशी अहवाल प्राप्त झाले असून यात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958चे कलम 39 (1) नुसार संबंधितांवर कारवाई प्रस्तावित करण्यात येईल. ग्रामविकास व जलसंधारण विभागाच्या शासन परिपत्रकानुसार तक्रारदार व अर्जदार यांना स्वत:चे म्हणणे मांडण्याची ही शेवटची संधी असून, यावेळी उपस्थित न राहिल्यास कारवाई करण्यात येईल.

तक्रारदार यांनी उपस्थित राहतेवेळी मूळ तक्रार अर्ज व चौकशी अहवाल व त्या अनुषंगाने आवश्‍यक ती कागदपत्रांसह व प्रकरणाचा मुद्देनिहाय गोषवारासहित उपस्थित राहणे आवश्‍यक आहे, असेही बजावण्यात आले आहे. निश्‍चित केलेल्या सुनावण्या या क्रमवारीनुसार होतील, असे सांगून 2 नंबरची सुनावणी कुरणेवाडी ग्रामपंचायतीची ठेवण्यात आली आहे.

 बारामती दूध संघाचे अध्यक्ष दोषी
कुरणेवाडी येथील ग्रामपंचायतीत वैयक्‍तिक लाभार्थ्यांचे तसेच ठेकेदारांचे धनादेश हे सेल्फ म्हणून अरेखांकित स्वरूपात काढण्यात आल्याचा गंभीर प्रकार घडलेला आहे. विभागीय आयुक्‍तांनी तसेच गटविकास अधिकारी यांनी या गैरव्यवहार प्रकरणात तत्कालीन सरपंच संदिप जगताप यांना दोषी धरलेले आहे. जगताप हे सध्या बारामती दूध संघाच्या अध्यक्षपदी आहेत. त्यामुळेच संपूर्ण तालुक्‍याचे या प्रकरणाकडे लक्ष लागून राहिले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)