पुणे जिल्हा: कागदी पिशव्या बनविण्याच्या प्रशिक्षणाला महिलांचा प्रतिसाद

ओतूर येथे स्वयं रोजगार व स्वावलंबनासाठी मोफत शिबिर

ओतूर – संभाजी तांबे प्रतिष्ठान संचलित आस्था महिला महिला मंच यांच्या सहकार्याने स्वयं रोजगार आणि स्वावलंबनासाठी कागदी पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण गुरूवारी (दि.24) ते सोमवार (दि.28) ओतूर (ता. जुन्नर) येथे मोनिका हॉल येथे आयोजित केले होते. या प्रशिक्षणाला महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या प्रशिक्षणाचे उद्‌घाटन जुन्नर पंचायत समितीच्या सभापती ललिता चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पुणे जिल्हा शिवसेना समन्वयक संभाजी तांबे, ग्रामपंचायत सदस्य आशिष शहा, आस्था महिला मंचाच्या अध्यक्षा निलीमा तांबे, मालती डुंबरे, ऍड. रोहिणी गाडेकर, रसवंती पानसरे, मोनिका शहा, सुकन्या शहा, डॉ. पुष्पलता शिंदे, ऍड. वृषाली मोरे, शबाना मोमीन, मंजुषा डुंबरे, डॉ. सुनिता वेताळ, प्रतिभा तांबे, वर्षा वल्हवणकर, कविता भोर, डॉ. रश्‍मी घोलप, संदीप बोचरे आदी मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी सभापती ललिता चव्हाण म्हणाल्या, पंचायत समिती मार्फत महिलांना, समाजकल्याण विभागामार्फत शिलाई मशीन, पिठाची गिरणी, बचत गटांना सतरंजी पुरविणे. तसेच पशुसंवर्धन विभागामार्फत मैत्रिण योजनेबाबतची माहिती देण्यात आली.
त्यानंतर महिला मंचाच्या अध्यक्षा निलीमा तांबे म्हणाल्या, महिला मंचाच्या वतीने यंदा विविध उपक्रम राबविले जाणार असल्याने महिलांसाठी आर्थिक, सामाजिक, मानसिकरित्या सबलीकरण आणि सक्षम बनविणे तसेच वैद्यकिय सल्ले, रोजगार मिळवून देणे, गृह उद्योगांना चालना आणि शासनामार्फत योजनांची माहिती पोहोचविण्यासाठी मार्गदर्शन केले जाणार आहे.
त्यानंतर मांडवी किनारा नागरी सहकारी पतसंस्थेथेचे अध्यक्ष संभाजी तांबे म्हणाले, आस्था महिला मंचाच्या वतीने चालविण्यात आलेले विविध उपक्रम महिलांच्या सबलीकरण आणि सक्षम बनविण्यासाठी आयोजित केले आहेत. तसेच प्लॉस्टिकमुक्त ओतूर अभिनयाची सुरुवात या प्रशिक्षणामार्फत राबवून केली. तसेच सध्या प्लॉस्टिक बंदीमुळे कागदी पिशव्यांची मागणी वाढत आहे.पर्यावरण संतुलनासाठी उपयोग होणार आहे. या कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य प्रशिक्षक सुनील मोरे, ढोरे, आस्था महिला मंच ओतूर, मोनिका महिला नागरी सहकारी पतसंस्था ओतूर यांचे लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)