fbpx

पुणे जिल्हा ऍडव्होकेट्‌स बार असोसिएशन अध्यक्षपदी ढमढेरे

तळेगाव ढमढेरे (पुणे) -शिरूर तालुक्‍यातील तळेगा ढमढेरे येथील ऍड. दीपक वसंतराव ढमढेरे यांची सन 2020-21 साला करिता पुणे जिल्हा ऍडव्होकेट्‌स बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली. यापूर्वी त्यांनी घोडनदी बार असोसिएशनचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलेले आहे.

 

ग्रामीण भागातील वकिलांच्या समस्या सोडवण्याकरिता तसेच शिरूर न्यायालयाची नवीन इमारत लवकर व्हावी, यासाठी प्रयत्न करणार असल्याचा त्यांनी मनोदय व्यक्त केला. त्यांच्या निवडीचे घोडनदी वकील संघाने स्वागत केले असून जिल्ह्यातील वकिलांनी आंनद व्यक्त केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.