पुणे – जातपंचायतीच्या घटनांत सातत्याने वाढ

अधिवेशनात तत्काळ बैठक घेण्याची मागणी

पुणे – कोैमार्य चाचणी, जातीतून बहिष्कृत करणे या गोष्टींवर कायद्याने बंदी आहे. तरीदेखील पुणे शहरासह अन्य ठिकाणी या कुप्रथा सुरूच आहे. त्यामुळे गृह विभाग, विमुक्त जमाती आणि सामाजिक न्याय विभाग यांनी या कायद्याची अंमलबाजवणी कशी होईल याकडे लक्ष दिले पाहिजे, अशी मागणी शिवसेना उपनेत्या व आमदार डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुरोगामी म्हणवल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात जातपंचायतीच्या घटनेत सातत्याने वाढ होत आहे. त्याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारच्या वतीने देण्यात आलेल्या आश्‍वासनाची पूर्तता करण्यासाठी तत्काळ बैठक घेण्यात यावी, अशी मागणीदेखील गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांच्याकडे करण्यात आली आहे.

महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारपासून व्यक्तींचे संरक्षण (प्रतिबंध, बंदी व निवारण) अधिनियम, कायदा 2016 अस्तित्वात आहे. तरीदेखील पुण्यात कंजार भाट समाजात वधूची कौमार्य चाचणी करण्याची कुप्रथा सुरूच असल्याचे समोर आले. समाजातील तरुण पिढीनं “स्टॉप द व्ही रिच्युअल्स’ मोहिमेद्वारे या पद्धतीच्या विरोधात आवाज उठवला आहे. मात्र, तरीही काहींना जातपंचायतीच्या जाचाला अजूनही शरण जावे लागते ही शरमेची बाब आहे. दरम्यान, कंजारभाट समाजाच्या प्रथांविषयी प्रबोधन करणाऱ्या त्याच समाजातील सुशिक्षित तरूणांना जातपंचायतीच्या सदस्यांकडून मारहाण होत असल्याबाबत अर्थसंकल्पीय अधिवेशनात स्वत: प्रश्‍न उपस्थित केला होता. त्यावेळी जातपंचायतीच्या पंचांनी हस्तक्षेप करणे कायद्याचे उल्लंघन ठरेल, असे माहितीपर परिपत्रक जरी करण्यात येईल, कौमार्य चाचणी जाहीर करणे यावर प्रतिबंध आणि त्यासाठी नियमावली करणे, यासह अन्य बाबींचे आश्‍वासन रणजीत पाटील यांनी दिले होते. या आश्‍वासनाचे स्मरण करून देण्यासाठी व अशा घटना समाजात घडू नयेत, यासाठी हे निवेदन सादर करत आहे, असे गोऱ्हे यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)