पुणे – गल्लीबोळांत हेल्मेट सक्‍तीची कारवाई नको?

अजब चर्चा : पालिका करणार पोलिसांना विनंती

पुणे – अनेक नागरिक लहान-मोठ्या कामांसाठी आपल्याच परिसरात दुचाकी वापरतात. मात्र, सीसीटीव्हीचा आधार घेत या नागरिकांकडून हेल्मेटचा न वापरण्याचा दंड आकारण्यात येतो.

त्यामुळे गल्ली-बोळांतील अशा वाहनांवर पोलिसांनी कारवाई करू नये, अशी मागणी महापालिकेने पोलिसांकडे करावी अशी चर्चा मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत रंगली.विकासकामांचा सूर आवळणाऱ्या महापालिकेच्या कारभाऱ्यांना शहरातील रस्ते, पाणी, नाले सफाई या समस्यांपेक्षा हेल्मेटचीच जास्त चिंता असल्याचे चित्र आहे. दरम्यान, शहरातील जोड आणि अंतर्गत रस्त्यांवर हेल्मेट सक्तीची कारवाई करू नये, अशी विनंतीवजा मागणी राव हे पोलीस आयुक्त के. व्यंकटेशम यांच्याकडे करणार असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

आयुक्‍तांच्या खांद्यावर बंदूक
स्थायी समितीत बहुतांश भाजपचेच सदस्य आहेत. तर शहरात हेल्मेटसक्ती झाल्यानंतर पोलिसांकडून कारवाई सुरू असतानाच; राजकीय पक्षांच्या दुचाकी फेऱ्यांमध्ये राजरोसपणे हेल्मेट न घालताही वाहने चालविली जाताना त्यांच्यावर काहीच कारवाई केली जात नाही. त्यामुळे हेल्मेट सक्तीला भाजप पदाधिकाऱ्यांचा विरोध असला, तरी ते जाहीरपणे बोलून दाखविण्यात अथवा पुढे येण्यास तयार नाहीत. याउलट ही सक्ती पुणेकरांवर नको, म्हणून महापालिका आयुक्तांवर दबाव आणून पोलीस आयुक्तांना पत्र देण्यास भाग पाडले जात असल्याचे समोर आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)