पुणे – कारखान्यांचा बॉयलर फेब्रुवारीपर्यंतच

साखर उद्योगातील सूत्रांचा अंदाज : उत्पादन घटण्याचा अंदाज

107 लाख टन
मागील हंगामातील उत्पादित साखर


90 लाख टन
यंदाचे अंदाजित साखर उत्पादन


17 लाख टन
उत्पादन घटण्याचा अंदाज


300 लाख टन
देशातील एकूण साखर उत्पादनाचा अंदाज

पुणे – राज्यातील दुष्काळी स्थितीमुळे साखर कारखान्यांचे बॉयलर यंदा लवकर म्हणजे फेब्रुवारीपासून बंद होण्यास सुरूवात होईल, असा अंदाज साखर उद्योगातील सूत्रांनी व्यक्त केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

आर्थिक क्षमता घटल्याने अतिशय नाजूक स्थितीतून कारखाने जात आहेत. दुष्काळामुळे हंगाम रेटत नेत 15 ते 28 फेब्रुवारीदरम्यान गाळप संपविण्याचे नियोजन मराठवाड्यातील कारखान्यांचे आहे. दि.1 ते 15 मार्चच्या दरम्यान सोलापूर आणि नगर भागातील हंगाम संपेल. पश्‍चिम महाराष्ट्रातील बहुतेक कारखाने मार्चअखेर बंद होतील.

राज्यात यंदा गेल्या हंगामाच्या तुलनेत साखर उत्पादन घटण्याचा साखर उद्योगाचा अंदाज आहे. गेल्या हंगामात राज्यात 107 लाख टन साखर तयार झाली. यंदा उत्पादन 17 लाख टनांनी घटून 90 लाख टनाच्या आसपास राहिल. देशाचे उत्पादन देखील गेल्या हंगामाच्या तुलनेत 25 लाख टनांनी घटून 300 लाख टनांच्या आसपास राहील, असा अंदाज आहे.
दुष्काळामुळे राज्याचे साखर उत्पादन अंदाजापेक्षा कमी राहील. कारखाने देखील लवकर बंद होतील. टॅंकरने पाणी आणून मराठवाड्यात काही ठिकाणी गाळप पूर्ण करण्याचे काम कारखाने करीत आहेत. एका बाजूला दुष्काळाचा फटका व दुसऱ्या बाजूला “एफआरपी’ची समस्या अशा दुहेरी कात्रीत कारखाने आहेत. साखर निर्यातीसाठी राज्य सरकारने पुढाकार न घेतल्याबद्दल सहकारी कारखान्यांनी नाराजी व्यक्‍त केली आहे. केंद्राकडून एक हजार रुपये व राज्याकडून 200 रुपये प्रतिक्विंटल मदत मिळाल्यास जादा साखर साठ्यांची समस्या दूर होईल. जवळच्या आशियाई देशांना साखर निर्यात झाल्यास साठे कमी होतील. मात्र, त्यासाठी गप्प बसलेल्या राज्य सरकारला पुढाकार घ्यावा लागेल. असे महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)