पुणे – कामगार दिनीच कामगारांचे आंदोलनास्त्र

जहॉंगिर हॉस्पिटल प्रशासनाविरोधात उभारला लढा

पुणे – “कामगार दिना’दिवशी जहॉंगिर हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांना स्वत:च्या मागण्यांसाठी लढा उभारावा लागला आहे. जहॉंगिर हॉस्पिटल ऍन्ड मेडिकल सेंटर कामगार युनियनच्या वतीने बुधवार (दि.1)पासून या आंदोलनाला सुरूवात झाली असून, दुसऱ्या कामगारांनी दिवशीही हा लढा सुरू ठेवत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. दरम्यान, “येत्या 24 तासांत जहांगिर रूग्णालयातील व्यवस्थापनाशी चर्चा करून त्यावर तोडगा काढू असे,’ आश्‍वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचे युनियच्या अध्यक्षा मनीषा धिवार यांनी सांगितले.

“हॉस्पिटलमधील कामगार आणि त्याचे पती किंवा पत्नी तसेच 21 वर्ष पूर्ण झालेले दोन मुले, आई-वडील यांच्यासाठी वैद्यकीय सुविधा मोफत मिळाव्यात, वार्षिक सुट्टया, दिवाळी बोनस (वार्षिक पगाराच्या 20 टक्के किंवा 20 हजार रुपये), वार्षिक वेतनवाढ, गेली 8 ते 10 वर्षे हंगामी कर्मचारी असलेल्या कर्मचाऱ्यांना कायम करणे या मागण्यांसाठी हे आंदोलन उभारण्यात आले आहे. त्याबाबत हॉस्पिटलच्या व्यवस्थापनला 15 दिवसांपूर्वीच नोटीस देण्यात आली. परंतु, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आंदोलनाचे पाऊल उचलावे लागले,’ असे युनियनकडून सांगण्यात आले.

आम्ही आमच्या हक्कासाठी लढत आहे. त्याबाबत व्यवस्थापनाकडे वेळोवेळी मागणी केली. मात्र, आमच्या मागण्या मान्य केल्या नाही. त्यामुळे हे आंदोलनाचे पाऊल उचलले आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आमचे आंदोलन सुरूच राहणार आहे.
– मनीषा धिवार, अध्यक्षा, जहॉंगिर हॉस्पिटल ऍन्ड मेडिकल सेंटर कामगार युनियन

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.