पुणे: कामगारांच्या पगारातून केलेली कपात परत करावी

कंत्राटी कामगारांची मागणी, कामगारांसाठी अभ्यास वर्ग संपन्न
पुणे – कमी पगार असलेल्या कामगारांना व्यवसाय कर लावण्यात येऊ नये, असे आदेश देण्यात आलेले आहेत. मात्र; हे वास्तव असतानाही वीज उद्योगातील कंपन्यांनी गेल्या काही वर्षांच्या कालावधीत व्यवसाय कराच्या माध्यमातून अनेक कामगारांच्या पगारातून करोडो रुपयांची कपात केली आहे. प्रशासनाने अनाधिकृतपणे वीज कंत्राटी कामगार, विद्युत सहाय्यक, सहाय्यक यंत्रचालक आणि महिला कामगारांच्या पगारातून ही कपात केली आहे. ही रक्कम प्रशासनाने तातडीने परत करावी, अशी मागणी कंत्राटी कामगारांनी केली आहे.

महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या वीजकंपन्यांमधील कामगारांना जीव धोक्‍यात घालून दररोज काम करावे लागते. या कंपन्यांमधील सुमारे 22 हजार कामगार सध्या जीव धोक्‍यात घालून काम करत आहेत. या कामगारांना या धोक्‍याची कल्पना यावी आणि त्यांना सुरक्षितपणे काम करता यावे यासाठी भारतीय मजदूर संघाशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्या वतीने कंत्राटी कामगारांसाठी अभ्यास वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी कंत्राटी कामगारांच्या वतीने ही मागणी करण्यात आली. भारतीय मजदूर संघाचे प्रदेश सरचिटणिस रविंद्र देशपांडे, वीज कामगार महासंघाचे संघटन मंत्री सुभाष सावजी, संघटनेचे अध्यक्ष शरद संत, सरचिटणिस सचिन मेंगाळे, प्रशांत भांबुर्डेकर, धनजंय इनामदार, उमेश आणेराव आणि सागर पवार आदी याप्रसंगी उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या अभ्यास वर्गामध्ये भविष्य निर्वाह निधी विभागाचे सहाय्यक आयुक्त अतुल कोतकर, निरीक्षक बी. बी. वागधरी, कामगार राज्य विमा कार्यालयाचे जगदीश सावंत, महावितरणचे सेवानिवृत्त सहाय्यक अभियंता संदिप कुलकर्णी, हरी सोहनी, रविंद्र देशपांडे, सजग नागरिक मंचाचे विवेक वेलणकर, संघटनेचे प्रमुख मार्गदर्शक अण्णाजी देसाई, वीज कामगार महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश होळीकर, संघाचे संघटन मंत्री निलेश खरात यांनी मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)