पुणे – कापडी पिशव्यांत दडंलय काय?

धोरणात्मक निर्णय झाला असतानाही जाहिरात


दक्षता विभागामार्फत चौकशी करण्याची मागणी

पुणे – कापडी पिशव्या आणि कचरा बकेट खरेदीत दरवर्षी होणारा घोळ लक्षात घेता या दोन गोष्टी खरेदी न करण्याचा धोरणात्मक निर्णय झाला. असे असताना कापडी पिशव्यांच्या खरेदीची निविदा महापालिकेने प्रसिद्ध केली आहे. ही निविदा प्रक्रिया ताबडतोब थांबवून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी “सजग नागरिक मंच’च्या विवेक वेलणकर आणि विश्वास सहस्रबुद्धे यांनी केली आहे.

दरवर्षीच कचरा बकेटसाठी प्रत्येकी 10 लाख रुपये याप्रमाणे खर्च सदस्यांकडून केला जात होता. त्यातून पर्यावरणपूरकतेच्या नावाखाली कापडी पिशव्यांचा खर्च गेल्या दोन वर्षांपासून सुरू झाला आहे. त्यातून बराच घोळ सुरू झाला. त्यामुळे येथून पुढे ही खरेदी न करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला. बकेट खरेदीचा निर्णय स्थायी समितीनेही गटनेत्यांच्या कोर्टात ढकलून दिला आहे. त्यामुळे त्या खरेदीविषयी अद्याप “घ्यायचे की नाही’, हा निर्णय झाला नसताना निविदेचे प्रकटन देण्यात आले आहे. 9 लाख 99 हजार 983 रुपयांची ही निविदा आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

एवढेच नव्हे, तर 10 लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीच्या वरील निविदा मंजुरीसाठी आणि अंतिम स्वाक्षरीसाठी महापालिका अतिरिक्‍त आयुक्तांकडे पाठवणे बंधनकारक आहे. त्यांच्याकडे ती जाऊ नये, यासाठी यासाठी ही निविदा 10 लाख रुपयांची न काढता त्यामध्ये 17 रुपये कमी करून 9 लाख 99 हजार 983 रुपयेच नमूद करण्यात आले आहे.
ही बाब अत्यंत गंभीर असून, याची दक्षता विभागामार्फत चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी अशी या दोघांची मागणी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)