पुणे – कर्नाटकी अननसापेक्षा केरळच्या फळाला मागणी

पुणे – कर्नाटक येथून येणाऱ्या “राजा’ जातीच्या अननसापेक्षा केरळ येथून येणाऱ्या “राणी’ जातीच्या अननसाची मार्केट यार्डातील फळ विभागात चलती आहे. राजा चवीने आंबट-गोड असतो. तर राणी गोड, रसदार, आणि गुणकारी असल्याने पुणेकरांकडून खाण्यासाठी तिला पसंती देण्यात येत आहे.

मार्केटयार्डात फळ विभागात आठवड्यात सुमारे 12 ते 15 ट्रक अननसची आवक होते. घरगुती ग्राहकासह हॉटेल, ज्युस चालकांकडून केरळच्या राणीला मागणी आहे. देशात केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, बिहार, आसाम आणि त्रिपुरा राज्यात अननसाची लागवड केली जाते. याबरोबर कोकणातही तुरळक ठिकाणी याची लागवड करण्यात येते. इतर राज्यांच्या तुलनेत केरळमध्ये अननसाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. हे पीक बाराही महिने उपलब्ध असल्याने तसेच गुणकारी असल्याने नागरिकांची याला मागणी असते.

तर, “राणी’ अनसनस आकाराने कमी आणि लांब असतो. विशेषत: मार्च ते एप्रिल या दोन महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उन्हाचा कडाका जाणवतो. त्यावेळी ज्युसला जास्त मागणी असते. त्यामुळे केरळ येथील स्थानिक बाजारपेठांसह देशातील विविध राज्यातून राणी अननसला मागणी असते. त्यामुळे त्या अननसचा तुटवडा निर्माण होतो. त्यावेळी येथील बाजारात कर्नाटकातील “राजा’ अननसावर पुणेकरांना अवलंबून रहावे लागते.

“राजाचे उत्पादन कर्नाटकातील बनवासी, शिरशी, सोराब, हुबळी या भागात होते. त्याचे वजन 1 ते साडेतीन किलो असते. तर राणीचे केरळ येथील मुवात्पुझा, वझाकुल्लम, कॅलिकट, कोचीन, एर्णाकुलम या भागात होते. त्याचे वजन 300 ग्रॅमपासून असते,’ असे व्यापारी अजित घुले यांनी सांगितले.

मार्च आणि एप्रिल सोडल्यास दहाही महिने केरळच्या राणीची बाजारात मोठी आवक राहते. सध्यस्थितीत कर्नाटकातून राजा जातीचे अननस दिल्ली येथे मोठ्या प्रमाणात पाठविण्यात येत आहे. त्याचा जाम, जेली आणि इतर उपपदार्थांसाठी वापर होत असल्याने प्रक्रिया उद्योगांकडून त्याला मागणी होत आहे.
– अजित घुले, अननसाचे व्यापारी.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)