पुणे उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची बदली

पुणे – राज्यातील परिवहन कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे परिपत्रक गृह विभागाचे अवर सचिव द.ह.कदम यांनी जारी केले. यात पुण्यातील उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांची सातारा येथे बदली झाली.

राऊत यांच्याकडे गेल्या काही महिन्यांपासून प्रभारी प्रादेशिक परिवहन अधिकारी पदाचा कार्यभार होता. यांसह बारामती कार्यालयातील उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनिलकुमार वळीव यांची परिवहन आयुक्त कार्यालय येथे बदली करण्यात आली आहे. लातूर येथील उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांची पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे बदली झाल्याचे परिपत्रकामध्ये नमूद केले आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here