पुणे – उत्पन्नवाढीसाठी पीएमपीचा व्यावसायिक आराखडा

खासगी कंपनीच्या मदतीने नियोजन

पुणे – गर्दीच्या मार्गावरील बसचे नियोजन, घटत चाललेले उत्पन्न याचबरोबर उत्पन्नवाढीसाठी करावे लागणाऱ्या नियोजनासाठी पीएमपी प्रशासनाने एका खासगी कंपनीची मदत घेतली आहे. या कंपनीकडून पीएमपीसाठी व्यावसायिक आराखडा तयार करण्यात येणार आहे. यामाध्यमातून उत्पन्नवाढीसाठी प्रयत्न होणार असल्याची माहिती पीएमपी प्रशासनाकडून देण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मागील काही महिन्यांपासून पीएमपीचे उत्पन्न घटत चालले आहे. याला ताफ्यातील जून्या बसेसची वाढती संख्या, अल्प प्रवासी, रद्द होणाऱ्या फेऱ्या आदी गोष्टी कारणीभूत आहेत. यावर पीएमपी प्रशासनाकडून उपाययोजना सुरू असून यासाठी आता एका खासगी कंपनीची मदत घेण्यात आली आहे. या कंपनीत वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञ लोकांचा समावेश आहे. कंपनीकडून पीएमपीला ुउत्पन्नवाढीसाठी कशापध्दतीने उपाययोजना आवश्‍यक आहेत, याविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे. विशेषतः दैनंदिन तिकीटविक्रीतून मिळणारी रक्‍कम कमी होत चालली आहे. या पार्श्‍वभूमीवर उत्पन्नवाढीसाठी मार्गनिश्‍चिती करणे तसेच तिकीट व्यतिरिक्त कसे उत्पन्न वाढवावे आदी बाबी या कंपनीकडून सुचवण्यात येणार आहेत. तसेच, कुठल्या मार्गावर किती बस सोडवाव्या, संचलनाव्यतिरीक्त कशापध्दतीने उत्पन्न मिळेल अशा सर्व गोष्टीचा अभ्यास कंपनी करणार असून पीएमपीचे उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टीकोनातून हा आराखडा तयार करण्यात येणार आहे.

व्यावसायिक आराखडा तयार करण्यासाठी खासगी कंपनीची नेमणूक करण्यात आली आहे. ही कंपनी पीएमपीचा सर्व अभ्यास करणार आहे. पीएमपीच्या अनेक अस्थापना असून यापासून कशापध्दतीने उत्पन्न मिळवता येईल आदींबाबत कंपनी मार्गदर्शन करेल.
– नयना गुंडे, अध्यक्षा तथा व्यवस्थापकिय संचालक, पीएमपी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)