पुणे – ईव्हीएम हाताळणीबाबत योग्य काळजी घ्यावी

डॉ. ज्योत्स्ना पडियार : मतदान यंत्रांबाबत प्रशिक्षण कार्यक्रम

पुणे – मागील लोकसभा निवडणुकीच्या वेळी इलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग मशिन्स (ईव्हीएम) वापरण्याचा अनुभव असला तरी यंदाच्या यंत्रांमध्ये नवीन फीचर्स असल्यामुळे त्याबाबत माहिती घेऊन त्यानुसार कार्यवाही करावी, अशा सूचना अतिरिक्त जिल्हाधिकारी तथा नोडल अधिकारी प्रशिक्षण डॉ. ज्योत्स्ना पडियार यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात मास्टर ट्रेनर्सना मतदान यंत्रांबाबत तसेच व्हीव्हीपॅट (वोटर व्हेरिफीएबल पेपर ऑडीट ट्रेल) बाबत प्रशिक्षण देण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख, शिल्पा करमरकर आदी अधिकारी उपस्थित होते.

यावेळी डॉ. पडियार म्हणाल्या, “2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी असलेल्या मतदान यंत्रासोबत व्हीव्हीपॅट नव्हते. त्यामुळे मतदान यंत्रांच्या जोडणीचा क्रम योग्य पद्धतीने लक्षात घेणे आवश्‍यक आहे. मतदान यंत्रांची काळजीपूर्वक हाताळणी, जोडणीचा क्रम न चुकवणे, दिलेल्या आदर्श सूचनांचे पालन करणे याबाबत त्यांनी सूचना दिल्या. मतदान यंत्रांच्या जोडणीबाबत पुरेसा सराव करण्यात यावा,’ असेही त्या म्हणाल्या.

उपजिल्हाधिकारी विजयसिंह देशमुख म्हणाले, लोकसभा निवडणुकीबाबत सर्वांनीच कटीबद्ध असणे गरजेचे आहे. मतदान यंत्रांबाबत मनात कोणताही प्रश्‍न, शंका न ठेवता, त्याचे निरसन करुन घ्यावे. सेक्‍टर ऑफिसर्सना मास्टर ट्रेनर्स प्रशिक्षण देणार असल्यामुळे त्यांनी आपले प्रशिक्षण काळजीपूर्वक पूर्ण करायला हवे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)