पुणे – आवरा…! शहरातील दुचाकींची संख्या 28 लाखांवर

पुणे – “वाहतूक कोंडीचे माहेरघर’ अशी ओळख होत चाललेल्या पुणे शहर आणि जिल्ह्यात दररोज नवी दीड हजार वाहनांची भर पडत आहे. यात दुचाकींची संख्या सर्वाधिक आहे. आरटीओच्या आकडेवारीनुसार आज शहरात तब्बल 28 लाख 9 हजार 602 दुचाकी आहेत. कुचकामी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेमुळे यात दिवसेंदिवस वाढच होत असल्याचे दिसत आहे. जर, या खरेदीला वेळीच आवर घातला नाही, तर पुण्याचे बंगळुरू होण्यास वेळ लागणार नाही, हे निश्‍चित.

वाहनसंख्येवर दृष्टीक्षेप
28,09,602
दुचाकी


6,30,848
कार/ अन्य चारचाकी


32,345
प्रवासी कॅब


64,655
ऑटोरिक्षा

मार्च 2017 मध्ये शहरात नोंदणीकृत वाहनांची संख्या 33 लाख 37 हजार 370 इतकी होती. त्यात मोठ्या प्रमाणात भर पडल्याने ऑक्‍टोबर 2018 मध्ये ही संख्या 37 लाख 86 हजार 2 इतकी झाली. वाढलेल्या वाहनांत सर्वाधिक संख्या दुचाकींची आहे. सध्या आरटीओच्या पुणे, पिंपरी-चिंचवड, बारामती कार्यालयांतर्गत वाहनांची संख्या प्रचंड वाढत असून यात दुचाकीसह कॅब, टुरिस्ट टॅक्‍सी, ऑटोरिक्षा, मालवाहू वाहनांचा समावेश आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, वाहनांच्या वाढत्या खरेदीचे कारण शोधले असता, शहरातील कुचकामी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हे त्याचे मूळ असल्याचे प्रमुख यापूर्वी अनेकदा समोर आले आहे. “सिटी मोबेलिट प्लॅन’नुसार लोकसंख्येचा विचार करता, शहरात किमान 5 हजार सिटीबसेसची आवश्‍यकता आहे. मात्र, पीएमपीच्या ताफ्यात पुरेशा बस नसून आहे त्यातील अनेक बस जुन्या झाल्या आहेत. यामुळे ब्रेकडाऊन, अपघात आदी प्रकार घडत असल्याचे दिसून येत आहे.

अबब…वर्षभरात 10 हजार कॅब वाढल्या
शहरात दुचाकींपाठोपाठ प्रवासी कॅबची संख्या दिवसेंदिवस वाढत असून सध्या 32 हजार 345 प्रवासी कॅब झाल्या आहेत. मार्च 2017 मध्ये ही संख्या 22 हजार 696 होती. दिवसेंदिवस प्रवासी कॅबची वाढत जाणारी संख्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेसाठी चिंताजनक असल्याचे दिसून येत आहे.

वाहन खरेदीचा आलेख दिवसेंदिवस वाढत असून पुणे शहर, पिंपरी-चिंचवड तसेच बारामती कार्यालयांतर्गत रोज सरासरी दीड हजार नव्या वाहनांची नोंदणी केली जात आहे. यात एकट्या दुचाकींची संख्या 1,200 च्या आसपास आहे.
– बाबासाहेब आजरी, प्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे


मी सिंहगड रोड परिसरात राहण्यास आहे. माझ्या घरापासून कॉलेजला जाण्यासाठी पीएमपी बसेस वेळेत नाहीत. शिवाय ज्या आहेत, त्या मार्ग आणि वेळेच्या दृष्टीने गैरसोयीच्या आहेत. त्यामुळे मला नवीन दुचाकी घेणे आवश्‍यक ठरले.
– अनुज कुलकर्णी, पुणे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)