पुणे – ‘आरटीई’ प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करा

पुणे – खासगी शाळांमध्ये “आरटीई’ अंतर्गत 25 टक्‍के प्रवेश देण्याबाबतच्या प्रक्रियेचे वेळापत्रक तातडीने जाहीर करा आणि प्रवेश प्रक्रियेमध्ये सुधारणा करा, अशी मागणी आप पालक युनियनतर्फे करण्यात आली आहे.

गेली अनेक वर्षे शिक्षण हक्‍क कायद्यांतर्गत 25 टक्‍के राखीव जागा पूर्ण भरण्यात शासनाला सातत्याने अपयश येत आहे. डिसेंबरमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याची घोषणा करत मागील वर्षी उशिराच म्हणजे जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात वेळापत्रक जाहीर करण्यात आले होते. त्याप्रमाणे आदेशानुसार जानेवारीमध्ये ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू करणे अपेक्षित होते; परंतु या वर्षीही शासनाकडून अद्याप वेळापत्रक जाहीर करण्यात आलेले नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

“आरटीई’ प्रवेश प्रक्रिया सुरू करून मार्च अखेर संपवणे गरजेचे असते. बऱ्यास शाळेना एप्रिलमध्ये सुट्टी असते आणि लॉटरीत नंबर न लागलेल्या मुलांना इतर शाळेत प्रवेश घेण्यास उशीर होतो. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होते. या कारणामुळे पालक अस्वस्थ झालेले आहेत.

दरवर्षी प्रवेशस्तर व शिल्लक जागा शाळांनी नोंदवणे अपेक्षित नसल्याने शासनाने तातडीने स्वतःकडील माहितीनुसार नोंदी करून शाळांच्या सकारण विनंतीने फक्‍त रिक्‍त जागा संख्याबदल असल्यास ते बदल करावेत. तसेच नोंद न केलेल्या खासगी शाळांना नोटीस द्याव्यात. त्यानुसार तातडीने वेळापत्रक जाहीर करावे, अशी मागणी आप पालक युनियनचे मुकुंद किर्दत, किशोर मुझुमदार, सैद अली यांनी प्राथमिक शिक्षण विभागाचे संचालक सुनील चौहान यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)