पुणे – आंदोलनकर्त्यांनी 10 पीएमपी जाळल्या

पुणे – आरक्षणासह इतर मागण्यांसाठी मराठा समाजाकडून राज्यभरात आंदोलन सुरु आहे. सोमवारी चाकणमधे सुरु असलेल्या आंदोलनाला दुपारनंतर हिंसक वळण लागले. आंदोलनकर्त्यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) 10 बस जाळल्या तर 5 बसेसची तोडफोड करुन नूकसान केले. यानंतर तात्काळ या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. दरम्यान, अगोदरच तोट्यात चाललेल्या पीएमपीला आता आंदोनलाचा मोठा फटका बसला आहे.

राज्यभरात मराठा समाजाकडून आंदोलन सुरु आहे. सोमवारी मराठा समाजाच्या वतीने पुणे जिल्हातील ग्रामिण भागात आंदोलन करण्यात आले. सुरवातीला शांततेत चाललेल्या या आंदोलनाने दुपारनंतर मात्र हिंसक वळण धारण केले. यामुळे चाकण परिसरात एसटी बस सोबत पीएमपी बसची तोडफोड करत काही बस जाळण्यात आल्या. मगरपट्टा भागात 1 आणि चाकण परिसरात 14 पीएमपी बसेसचे नुकसान करण्यात आले आहे. जमावाने एकूण 10 बसेस पेटून दिल्या तर 5 बसेसची तोडफोड केली. यामुळे दुपारी एक नंतर या राजगुरुनगर, चाकण मार्गावरील बसेसच्या फेऱ्या रद्द केल्याचे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले. आंदोलन चिघळल्याने सोमवारी 15 बसचे नुकसान करण्यात आले. यामुळे पीएमपीचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. यामुळे अगोदरच तोट्यात चाललेल्या पीएमपीला आंदोलनाचा मोठा फटका बसला आहे.
—————–
– वाहतूक व्यवस्थापक, अपघात प्रमुख तात्काळ घटनास्थळी
चाकण परिसरात आंदोलन चिघळल्याने पीएमपीच्या जवळपास 10 बसेस जमावाने जाळल्या. तर 5 बसेसची तोडफोड केली. यामुळे दुपारनंतर या मार्गावरील वाहतूक पीएमपी प्रशासनाच्यावतीने बंद करण्यात आली. बस जाळल्याची माहिती मिळताच पीएपीचे वाहतूक व्यवस्थापक दत्तात्रय माने आणि अपघात प्रमुख कुसाळकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.
——————–

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)