पुणे – अकरा ‘स्टार्टसअप’ना उद्योगांसाठी पाठबळ

विद्यापीठातील “इनक्‍युबेशन सेंटर’चे निकाल जाहीर

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील “सेंटर फॉर इनोवेशन इन्क्‍युबेशन अँड लिंकेजेस’ या केंद्राच्या वतीने नवउद्योजकांसाठी घेण्यात आलेल्या स्पर्धेचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यात सहभागी झालेल्या 33 पैकी 11 उमेदवारांना निवडण्यात आले असून, त्यांना उद्योगांसाठी पाठबळ दिले जाणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सर्व सहभागींना त्यांच्या कल्पना व करीत असलेले काम सादर करण्यासाठी 5 व 6 जानेवारी रोजी संधी देण्यात आली होती. या सहभागींची निवड करण्यासाठी उद्योगांचे प्रवर्तक, गुंतवणूकदार, नवउद्योगांचे तज्ज्ञ व प्रत्यक्ष उद्योगपती अशा तज्ज्ञांची निवड समिती नेमण्यात आली होती. त्यात प्रमोद चौधरी, आनंद छाब्रिया, पराग शहा यांच्यासह विविध तज्ज्ञांचा समावेश होता. त्यांनी 11 जणांची निवड केली आहे.

निवड झालेले नवउद्योजक (कंसात कंपन्यांची नावे) –
सुधीर देशमुख (एक्‍शनेबल इनसाईट्‌स), रणधीर जया नायडू (डिजिटल नेटिव्हज्‌), चंद्रशेखर बोरकुटे (इ-इनोव्हेशन टेक्‍नॉलॉजीज प्रा. लि.), रजनीश कुमार (ओपिन्टा सिस्टिम्स), योगेश गोरख बच्छाव (डेव्हलपिंग शुगर फ्री च्युईंगम), हर्षद भागवत (वर्डस्‌ माया), ऋषीकेश मेहता (स्मार्ट वॉटर इन्फर्मेशन अँड मॅनेजमेंट सिस्टिम), स्वप्निल कांबळे / प्रेम पांडे (नॅनो-बायोटेक हर्बल कंपनी), अक्षय कंकाळ (होम एटोमेशन सिस्टिम लि.), डॉ. अरुण बानापूरकर (लो कॉस्टिंग रॅपीड अँड हाय एक्‍युरेसी ब्लड ग्रुप टेस्टिंग डिव्हाईस), सुयोग राऊत (मॅन्युफॅक्‍चरिंग ऑफ मेटल, मेटाऑक्‍साईड नॅनो पार्टिकल).

नवउद्योजकांना यशस्वी व्यक्‍तींचे मार्गदर्शन
निवडलेल्या 11 नवउद्योजकांना विद्यापीठाकडून त्या त्या विषयातील यशस्वी व्यक्‍तींकडून मार्गदर्शन दिले जाणार आहे. त्याचबरोबर त्यांना कार्यालयासाठी जागा तसेच त्यांच्या उत्पादनांसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी साह्य केले जाणार आहे, अशी माहिती या केंद्राच्या संचालक डॉ. अपूर्वा पालकर यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)