पुणे – अंध विद्यार्थ्यांची निकालात बाजी

पुणे – “नॅशनल असोसिएशन फॉर द वेलफेअर ऑफ फिजिकली चॅलेंज्ड’ (एनएडब्ल्यूपीसी) संस्थेच्या माध्यमातून बारावीच्या परीक्षेसाठी 6 अंध विद्यार्थी बसले होते. हे सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. अनुक्रमे युवराज दळवे 82 टक्‍के, अनिल राठोड 82 टक्‍के, आदिनाथ 75 टक्‍के, चेतन शिरसाठ 68.69 टक्‍के, स्वप्नील पाटील 68 टक्‍के, मयुर जाधव 67.27 टक्‍के, ऋषिकेश पाटील 52 टक्‍के अशा प्रकारे उत्तम गुण मिळवून बारावी परीक्षेत विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे.

“एनएडब्ल्यूपीसी’ ही संस्था अधं तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी गेली 20 वर्षे अव्याहतपणे कार्यरत आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेच्या वतीने संगणक प्रशिक्षण वर्ग, वसतिगृह, डिजिटल लायब्ररी, शिष्यवृत्ती सेंटर, शिष्यवृत्ती प्रकल्प, बॅंकिंग क्‍लास, संगीताचे शिक्षण आदी उपक्रम मोफतपणे चालविले जातात.

या विद्यार्थ्यांना बारावी परीक्षेत चांगले यश मिळावे, यासाठी संस्थेने विशेष प्रयत्न केले. या विद्यार्थ्यांची राहणे-खाण्याची मोफत सोय संस्थेद्वारे करण्यात आले. तसेच, संस्थेत खास क्‍लास आयोजित करण्यात आले होते. निवृत्त प्राध्यापिका प्रमिला पाटील, त्रिशिला गायकवाड, संस्थेचे संस्थापक राहुल देशमुख, विश्‍वस्त देवता अंदुरे-देशमुख यांनी विद्यार्थ्यांना वर्षभर मार्गदर्शन केले. अंधत्वावर मात करीत या विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेत यश संपादन केले आहे, त्याचे विशेष कौतुक होत आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.