पुणेकरांनो यंदाच्या उन्हाळ्यात पोहायला जाण्याआधी ‘हे’ नक्की वाचा…

संग्रहित छायाचित्र

सुनील राउत

सात जलतरण तलावांमध्ये मृत्यूंचे सावट, सुरक्षा समितीचा धक्कादायक अहवाल
महापालिकेचे केवळ 4 तलाव पोहण्यासाठी पूर्णपणे सुरक्षित
पुणे : महापालिकेने शहरातील नागरिकांसाठी उभारलेल्या 31 तलावांमधील 10 तलाव बंद असून उर्वरीत 21 तलावांमधील 7 तलाव पोहण्यासाठी असुरक्षित असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ठेकेदारांच्या माध्यमातून चालविल्या जाणाऱ्या या तलावांमध्ये पोहण्यासाठी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेसाठी आवश्‍यक असलेली साधनेच नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे ऐन उन्हाळयात या तलावांमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या नागरिकांना जीव मुठीत घेऊन आपली पोहण्याची हौस भागवावी लागत आहे.

तळजाई टेकडीवरील महापालिकेच्या क्रीडा संकुलातील जलतरण तलावात प्रफुल्ल वानखेडे या 21 वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे जलतरण तलावांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला. त्यामुळे या तलावांचे सुरक्षा ऑडिट करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या दोन आठड्यांपूर्वी झालेल्या स्थायी समितीमध्ये मान्य करण्यात आला होता. त्यानुसार नेमण्यात आलेल्या पाच सदस्यित समितीने या तलावांची तपासणी केली असता ही बाब समोर आली आहे.
महापालिकेकडून शहरात उभारण्यात आलेले जलतरण तलाव पालिकेस चालविणे शक्‍य नसल्याने ठेकेदारांना चालविण्यासाठी दिले जातात. उन्हाळ्याचे दिवस असल्याने तलावांमध्ये येणाऱ्या नागरिकांची गर्दी खूप असते. अशावेळी महापालिकेने घालून दिलेले सुरक्षा नियम ठेकेदारांकडून पाळले जातात की नाही, हे तपासणे महापालिकेची जबाबदारी आहे. ही बाब लक्षात घेऊन अशा प्रकारच्या दुर्घटना टाळण्यासाठी तातडीने सर्व तलावांची सुरक्षा तपासणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यानुसार,जलतरण तलावांच्या ऑडिटसाठी प्रशासनाकडून सहा सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. संजीव वावरे, भवन रचना विभागाचे उप अभियंता शिशीर बहुलीकर, मालमत्ता व्यवस्थापन विभागाचे उप अभियंता मिलिंद घोलप यांच्यासह क्रीडा विभागाचे गोपाळ चव्हाण आणि राष्ट्रीय लाईफ सेव्हिंग सोसायटीचा एक प्रतिनिधीची नेमणूक करण्यात आली होते. या समितीने 21 ते 23 एप्रिल 2018 या कालावधीत या तलावांची तपासणी करून आपला अहवाल मंगळवारी अतिरिक्त आयुक्तांना सादर केला आहे.

सात तलाव पोहण्यासाठी असुरक्षीत
या समितीने महापालिकेच्या 31 मधील 21 तलावांची तपासणी केली आहे. त्यात 10 तलाव बंद आहेत. समितीने दिलेल्या अहवालानुसार, 21 मधील 4 तलाव पोहण्यासाठी पूर्णपणे सुरक्षीत आहेत. तर 9 पूल सरासरी सुरक्षीत आहेत, 7 पूल पूर्णपणे असुरक्षीत आहेत. तर महापालिकेच्याच मालकीच्या असलेल्या एका जलतरण तलावांमध्ये चक्क पालिकेच्याच या सुरक्षा तपासणी समितीने येऊ देण्यात आले नाही. या सात असुरक्षीत तलावांमध्ये कात्रज येथील डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम तलाव, विश्रांतवाडी येथील नानासाहेब परूळेकर तलाव, येरवडा येथील केशवराव विठोबा ढेरे तलाव, सहकार नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर क्रीडा संकूल तलाव, शनिवार पेठ, यशकला जलतरण तलाव, हडपसर येथील पिराजी कोयाजी डांगमाळी जलतरण तलाव या तलावांचा समावेश आहे. तर बालगंधर्व येथील महापालिकेच्या नांदे तलावाच्या तपासणीसाठी गेलेल्या या पथकाला ठेकेदारांकडून तलावाची तपासणी करण्यास मज्जाव घालण्यात आला आहे. त्यामुळे या तलावाची तपासणी न करताच; पथकाने आपला अहवाल सादर केला आहे.

या पथकाने केलेल्या तपासणीत या तलावांमध्ये प्रशिक्षण घेतलेले लाईफ गार्ड, संबधित ठेकेदाराकडे जलतरण चालविण्याचा परवाना आहे किंवा नाही., फिल्टरेशन प्लॅन्ट, पाण्यतील क्‍लोरिन तपासणी, जीव रक्षक साधणे, दोऱ्या, ट्युब, बांबू टायर, पकडण्यासाठी रेलिंग आहेत कींना नाहीत, जलतरण तलावाच्या क्षमतेनुसार, प्रवेश दिले जात आहेत कींवा नाहीत याची तपासणी करण्यात आले आहे.

असे आहे तलावांच्या सुरक्षेचे चित्र


एकूण तलाव : 31


बंद असलेले तलाव : 10


सरासरी सुरक्षित तलाव : 9


सुरक्षित तलाव : 4


असुरक्षित तलाव : 7


तलाव तपासणीस मनाई : 1


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
49 :thumbsup:
2 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)