पुणेकरांनो, तुमचं नाव मतदार यादीत आहे का?

पुणे – पुढील महिन्यांत देशभरात लोकसभा निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर नवीन मतदार याद्या तयार करण्याचे आता पूर्ण झाले आहे. पुणे जिल्ह्यातील मतदार संघातील मतदार याद्या पाहण्याची संधी दिली जाणार आहे. यासाठी विविध शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांना या याद्या उपलब्ध झाल्या आहेत.

निवडणुकीपूर्वी नेहमीच हा प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाच्यावतीने मतदार याद्यांचे पुनर्निमाण करण्याचे काम सुरू होते. त्यानुसार गेले महिनाभर हे काम सुरू होते. 31 जानेवारी रोजी हे काम पूर्ण झाल्यावर मतदार संघानुसार याद्या तयार करण्यात आल्या आहेत.या याद्यांमध्ये सगळ्यात मतदार संघात मतदारांची संख्या वाढलेली आहे. नवीन मतदारांना आपले नाव यादीत समाविष्ट झाले आहे, की नाही हे पाहण्यासाठी आता संधी मिळणार आहे.

जिल्ह्यातील सर्व मतदार केंद्रावर तसेच विधानसभा मतदार संघाच्या कार्यालयांमध्ये या याद्या पाहण्यासाठी ठेवण्यात आल्या आहेत.येत्या दोन महिन्यांत होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी ही मतदार यादी अंतिम राहणार आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपले नाव समाविष्ट झाले आहे, की याची पाहणी करुन घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.