पुणेकरांना लिची फळाचा गोडवा

मार्केट यार्डात पश्‍चिम बंगालमधून आवक सुरू

पुणे – गोड, आंबट चवीच्या आणि बाहेरून लवचिक काटेरी आवरण असलेल्या “लिची’ या फळाचा हंगाम सुरू झाला आहे. मार्केट यार्डातील फळबाजारात याची आवक सुरू झाली आहे. ग्राहकांकडून या फळाला मोठी मागणी असल्याने त्याचे भाव तेजीत आहेत. घाऊक बाजारात लिचीच्या प्रतिकिलोस 150 रूपये तर किरकोळ बाजारात 200 रुपये भाव मिळत आहे.

“गुलटेकडी मार्केटयार्ड फळबाजारात कलकत्ता येथून गेल्या चार दिवसांपासून लिचीची आवक सुरू झाली आहे. सध्या दररोज सुमारे 250 बॉक्‍स इतकी आवक होत आहे. एका बॉक्‍सचे वजन 8 किलो इतके आहे. घाऊक बाजारात 8 किलोच्या एका बॉक्‍सला 1,200 ते 1,600 रुपये भाव मिळत आहे,’ अशी माहिती लिचीचे व्यापारी राजेश परदेशी यांनी दिली.

परदेशी म्हणाले, “लिची फळाचा हंगाम मे महिन्याच्या सुरूवातीला होतो. जुलैपर्यंत तो सुरू असतो. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही हंगाम वेळेत सुरू झाला आहे. फळाचा दर्जा चांगला आहे. सध्या लिचीला मागणी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे भावात काहीशी तेजी आहे. पुढील आठवडाभरात लिचीची आवक आणखी वाढेल त्यानंतर भावात आणखी घट होईल.’

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.