सुनील राऊत
पुणे : महापालिका प्रशासनाने प्रस्तवित केलेली 12 टक्के मिळकतकर वाढ महापालिकेच्या स्थायी समितीने फेटाळली आहे. त्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. या दरवाढीवर निर्णय घेण्यासाठी गुरुवारी खास सभा बोलाविण्यात आली होती. त्यात ही दरवाढ फेटाळण्यात आली आहे. तर प्रशासनाने करवाढ न करता थकबाकी वसुली आणि इतर पर्यायावर भर द्यावा अशा सूचना केल्या . दरम्यान या पूर्वीच स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी करवाढ ना करण्याचे संकेत दिले होते. मात्र, स्थायी समितीच्या या निर्णयाने महापालिका आयुक्तांचे अंदाजपत्रक 160 कोटींनी कमी झाले आहे. आयुकतांनी ही करवाढ गृहीत धरून अंदाजपत्रक सादर केले होते.