पुजा सावंत ‘दादासाहेब फाळके पुरस्काराने’ सन्मानित

मराठीतील कलरफुल अभिनेत्री पुजा सावंतचा ‘लपाछपी’ हा सिनेमा चांगलाच गाजला होता. या सिनेमातील तिच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय पुरस्कारानेदेखील घेतली आहे. तिच्या या पुरस्कारांच्या यादीत आणखीन एक मानाचा पुरस्कार सामील झाला आहे.

भारतीय चित्रपटाचे जनक दादा साहेब फाळके यांच्या १४९ व्या जयंतीप्रित्यर्थ स्माईल फाउंडेशन आयोजित वांद्रे येथील सेंट अॅड्रयूज ऑडीटोरियममध्ये  नुकत्याच झालेल्या दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी पुजाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून नावाजण्यात आले आहे. स्माईल फाउंडेशन अखत्यारीत देण्यात येणारा हा पुरस्कार दादासाहेब फाळके यांच्या कुटुंबियांकडून चित्रपटसृष्टीतील यशस्वी कलाकारांना त्यांच्या कामगिरीसाठी देण्यात येतो. त्यानुसार यावर्षीचा हा मान ‘लपाछपी’ सिनेमातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल पुजाला मिळाला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)