पी.व्ही.सिंधू भारतातील सर्वात प्रतिभावान आणि प्रेरणा देणाऱ्या अँथलेटिक्सपैकी एक – नरेंद्र मोदी  

नवी दिल्ली: भारताची स्टार महिला बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधू हिला आशियाई स्पर्धेतदेखील रौप्यपदकावर समाधान मानावे लागले आहे. सुवर्णपदकासाठीच्या सामन्यात तिला चायनीज तैपेईची खेळाडू ताई जी यिंग हिच्याकडून पराभूत २१-१३ २१- १६असे पराभूत व्हावे लागले आहे. त्यामुळे तिला रौप्य पदकावर समाधान मानावे लागले आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पी.व्ही सिंधूचे अभिनंदन केले आहे. नरेंद्र मोदी म्हणाले, “पीव्हीसिंधू  भारतातील सर्वात प्रतिभावान आणि प्रेरणा देणाऱ्या अँथलेटिक्सपैकी एक आहे. तिचे कौशल्य आणि चिकाटी हे लक्षणीय आहेत. तिने आशियाई गेम्स2018 मध्ये बॅडमिंटनमधील रौप्य पदक जिंकले. 125 कोटी भारतीयांना तिचा अभिमान आहे.”

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

https://twitter.com/narendramodi/status/1034362457995665408

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)