‘पीसीएमसी’ बळीराजाच्या मदतीला धावणारी संस्था!

पिंपरी – संस्थेच्या सभासदांचे हित साध्य करीत असताना सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून बळीराजाला मदत व्हावी. या उद्देशाने उपक्रम राबवणारी “पीसीएमसी’ कर्मचारी पतसंस्था ही राज्यातील एकमेव पंतसंस्था आहे, असे मत आमदार महेश लांडगे यांनी व्यक्‍त केले.

पीसीएमसी कर्मचारी पंतसंस्था, पीसीएमसी महासंघ, पीएमपीएमएल कर्मचारी महासंघ आणि पीसीएमसी कामगार कल्याण मंडळांची 2017-18 ची वार्षिक सर्व साधारण सभा भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात संपन्न झाली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यावेळी पिंपरी-चिंचवडच्या उपमहापौर शैलेजा मोरे, अतिरिक्‍त आयुक्‍त दिलीप गावडे, कर्मचारी महासंघ व पीएमपी महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे, पतसंस्थेचे अध्यक्ष आबा गोरे, कामगार कल्याण मंडळांचे अध्यक्ष प्रमोद जगताप, सहाय्यक आयुक्‍त चंद्रकांत इंदलकर, नगरसेवक संतोष लोंढे, पतसंस्थेचे संचालक संजय कुटे, सीमा सुकाळे, महाद्रंग वाघेरे, अंबर चिंचवडे, मनोज माछरे, मधुकर रणपिसे, राजाराम चिंचवडे, सतिश गव्हाणे, नथा मातेरे, रमेश चोरघे, भगवान मोरे, चारुशिला जोशी, महादेव बोत्रे, दिलीप गुंजाळ, यशवंत देसाई, नंदकुमार घुले, पतसंस्थेचे व्यवस्थापक नंदकुमार कोंढाळकर आदींसह हजारों कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते सेवानिवृत्त सभासद, सलग 25 वर्षे सभासद व गुणवंत विद्यार्थी व खेळाडू यांचा सत्कार करण्यात आला. यानंतर पीसीएमसी कर्मचारी महासंघाच्या बैठकीत पिंपरी चिंचवड महापालिका कर्मचारी महासंघाच्या अध्यक्षपदी बबन झिंजुर्डे यांची फेरनिवड झाली आहे. तसेच हनुमंत लांडगे (सेवानिवृत्त सेल अध्यक्ष), मनोज माछरे (मगासवर्गीय सेल अध्यक्ष), चारुशीला जोशी (महासचिव), अतुल आचार्य (कार्यालय प्रमुख), अंबर चिंचवडे, महाद्रंग वाघेरे, मुकुंद वाखारे, शिवाजी येळवंडे (कार्याध्यक्ष), नितीन समगीर (खजिनदार), दिगंबर चिंचवडे (सहखजिनदार), दिलीप गुंजाळ, सुनील विटकर, विशाल भुजबळ, महादेव बोत्रे, राणू ठोकळ (संपर्कप्रमुख), दीपक गळीतकर, नंदकुमार घुले, बालाजी अय्यंगार, रमेश चोरघे, हनुमंत चाकणकर (उपाध्यक्ष), सुधीर वायदंडे, अविनाश ढमाले, गौतम भालेराव, राजाराम चिंचवडे, मोहिद्दीन तांबोळी (सचिव) यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)